ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीच्या तीन मल्लांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड;राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीच्या तीन मल्लांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड;राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
रत्नागिरी

रत्नागिरीच्या तीन मल्लांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड;राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 11:23 am
Gramin Varta
46 Views
Share

रत्नागिरी: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील मल्लांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर सुवर्णपदकांना गवसणी घालत जिल्ह्याचे नाव राज्यभरात उज्ज्वल केले आहे. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या तिन्ही खेळाडूंची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील आदर्श हायस्कूल कुरतडे या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी केली. ५२ किलो वजन गटात सोहम खंडेराव पाटील याने तर ५७ किलो वजन गटात समर्थ संजय कुदळे याने सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही गुणवंत मल्लांना क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक मानसिंग कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ​तसेच महात्मा गांधी विद्यालय उंबरे येथील राजवीर सतीश पवार या मल्लाने ३८ किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. राजवीर याला मार्गदर्शक मारुती गलांडे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व यशस्वी खेळाडूंना रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
​रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खेळाडूंच्या सरावासाठी आधुनिक ‘कुस्ती मॅट’ उपलब्ध करून दिल्या आहेत. मॅटवरील नियमित सरावामुळेच यंदाच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या खेळाडूंना हे मोठे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया विजयी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केली.

​राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सोहम पाटील, समर्थ कुदळे आणि राजवीर पवार या तिन्ही खेळाडूंचे, तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे रत्नागिरीचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी कौतुक करत पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

महाराष्ट्रात महिला उद्योजकता परिसंस्था बळकट करण्यासाठी राज्य-आधारित स्टार्ट अप हबची स्थापना; कौशल्य विकास विभाग आणि उदैती फाउंडेशनदरम्यान महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

Gramin Varta
3 Min Read

शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा; मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांना आवाहन

Gramin Varta
3 Min Read

विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : कोंडये तर्फे सौंदळ येथे मोकाट सोडलेल्या गायीने पिकलेली भातशेती तुडवली; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

जयगड-नांदिवडे मार्गावर बेदरकारपणे क्रेन चालवणे भोवले; उत्तर प्रदेशातील चालकावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी: बाथरूममध्ये पाय घसरून पडलेल्या नाचणे येथील ८० वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वी मृत्यू

1 Min Read
रत्नागिरी

जि.प.आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडीत ‘नवदुर्गांना वंदन’ उपक्रम संपन्न

3 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीतील वारे समुद्रकिनारी खडकात आढळला तरुणाचा मृतदेह

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?