ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांज्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात ठाकरे गट आक्रमक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांज्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात ठाकरे गट आक्रमक
लांजा

लांज्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात ठाकरे गट आक्रमक

Gramin Varta
Last updated: October 27, 2026 7:43 pm
Gramin Varta
166 Views
Share

वाढीव बिले व कथित २२०० फॉल्टी मीटरवरून अधिकाऱ्यांना घेरले, स्मार्ट मीटर सक्तीला कडाडून विरोध

लांजा / अरबाज नेवरेकर: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सलग पाच-सहा महिने मीटरचे रीडिंग न घेणे, परस्पर भरमसाठ सरासरी बिले पाठवून सामान्य ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करणे आणि त्यानंतर मीटर नादुरुस्त असल्याचे भासवून परस्पर स्मार्ट मीटरची सक्ती करणे या महावितरणच्या संशयास्पद व मनमानी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार एल्गार पुकारला आहे. या संपूर्ण अनागोंदी कारभाराची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करून अन्यायग्रस्त वीजग्राहकांना न्याय मिळवून द्यावा, तसेच कोणत्याही परिस्थितीत जनतेवर स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न करू नये, असा थेट इशारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेना लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने स्थानिक महावितरण कार्यालयावर धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि प्रश्नांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरले.

तालुक्यातील अनेक भागांमध्ये गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मीटर रीडिंगच घेतले जात नसल्याच्या नागरिकांच्या तीव्र तक्रारी असून, त्यामुळे ग्राहकांच्या माथी अव्वाच्या सव्वा रकमेची सरासरी बिले मारली जात आहेत. संतप्त ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार केल्यानंतर बिलांमध्ये थातूरमातूर कपात केली जाते; मात्र त्याच वेळी मूळ मीटर फॉल्टी असल्याचे कारण पुढे करून नव्या मीटरसाठी अर्ज भरण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप पक्षाने केला आहे. वेळेवर अचूक रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देणे आणि सदोष बिले दुरुस्त करून देणे हे महावितरणचे मूलभूत कर्तव्य असताना निष्पाप ग्राहकांना कार्यालयाचे उंबरठे का झिजवावे लागतात, असा संतप्त सवाल यावेळी अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.

तालुक्यात तब्बल २२०० मीटर नादुरुस्त असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी हा आकडा कोणत्या तांत्रिक निकषांवर निश्चित करण्यात आला, मीटरची प्रत्यक्ष जागेवर तपासणी कोणी केली, त्याचे लेखी तपासणी अहवाल उपलब्ध आहेत का आणि त्याचे निष्कर्ष संबंधित ग्राहकांना कळवले गेले आहेत का, असे थेट प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने या दाव्यातील हवा काढून घेतली. प्रत्येक संशयित मीटरची नियमानुसार स्वतंत्र तपासणी करून नादुरुस्तीचा अधिकृत निष्कर्ष ग्राहकांना लेखी स्वरूपात देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अधिकृत तपासणीत मीटर खरोखरच नादुरुस्त आढळल्यास नियमानुसार पर्याय द्यावेत; परंतु या प्रक्रियेचा गैरफायदा घेऊन ग्राहकांवर स्मार्ट मीटरची जबरदस्ती करणे खपवून घेतले जाणार नाही. ग्राहकांच्या पूर्वपरवानगीशिवाय परस्पर जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याचा आगाऊपणा केल्यास कायदेशीर मार्गाने दाद मागून संबंधितांवर मीटर चोरीचे थेट गुन्हे दाखल करू, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला.

ग्राहकांच्या हक्कांचे सर्रास उल्लंघन खपवून घेतले जाणार नसून केवळ पोकळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून ही चुकीची बिले दुरुस्त करावीत आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करावी, अशी मागणी करण्यात आली. महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारताना तालुकाप्रमुख युवराज हांदे यांच्यासमवेत विभागप्रमुख लक्ष्मण मोर्ये, उपशहरप्रमुख प्रकाश ऊर्फ बाबू गुरव, सागर वायंगणकर, उपविभागप्रमुख राजेंद्र सुर्वे, जितेंद्र कदम, शांताराम गुरव, अल्लादिन नेवरेकर, बाबा धावणे, दिनेश गुरव, विघ्नेश गुरव, दामोदर खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :

5469380
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारताचा ३-० ने मालिका विजय; हरमनप्रीत कौरच्या वादळी नाबाद ९१ धावांमुळे झिम्बाब्वेचा ९२ धावांनी धुव्वा

Gramin Varta
2 Min Read

पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका; किडनीच्या आजाराचा असू शकतो इशारा! बरगड्यांखाली वेदना, ताप आणि लघवीतील बदल ही पाच लक्षणे ओळखा

Gramin Varta
5 Min Read

सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा मोठा निर्णय;निवडणूक आयोगाच्या उप आयुक्तपदी सनदी अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची नियुक्ती

Gramin Varta
2 Min Read

पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले अन् सात जणांचा काटा काढला; हत्याकांडाने देश हादरला, नंदी हिल्सच्या पायथ्याशी मृतदेहांची शोधमोहीम!

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

लांजा

पाककलेचा समृद्ध वारसा! लांजातील ज्ञानेश्वरी वाघधरेने अवघ्या काही तासांत साकारला बाप्पासाठी ४२ नैवेद्यांचा थाट

2 Min Read
लांजा

ब्रेकिंग : लांजा ज्येष्ठ महिलेच्या खून व जबरी चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा

2 Min Read
लांजा

अंजणारी घाट बनतोय मृत्यूचा सापळा; १३ ऑगस्टच्या निवेदनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघातांची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची दत्ताजी कदम यांची मागणी

3 Min Read
लांजा

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?