ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कलेच्या श्रीमंतीने जीवन समृद्ध करा; फाटक हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कलेच्या श्रीमंतीने जीवन समृद्ध करा; फाटक हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
रत्नागिरी

कलेच्या श्रीमंतीने जीवन समृद्ध करा; फाटक हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Gramin Varta
Last updated: October 31, 2026 9:52 am
Gramin Varta
27 Views
Share

रत्नागिरी : वाचन, चिंतन, मनन आणि उत्तम संस्कारांतूनच परिपूर्ण माणूस घडत असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या कलाक्षेत्राची निवड करून निरंतर साधना करावी आणि कलेच्या श्रीमंतीने स्वतःचे आयुष्य अधिक समृद्ध करावे, असे विचार ज्येष्ठ कवी व गीतकार प्रवीण दवणे यांनी मांडले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि दि न्यू एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने फाटक हायस्कूलमध्ये आयोजित ‘लेखक आपल्या भेटीला’ या विशेष उपक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिकांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी विचारमंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी कलावंतांच्या सहवासातूनच नवे कलाकार घडत असल्याचे स्पष्ट करत, शालेय वय हेच अंतस्थ कलागुणांना ओळखण्याचा सुवर्णकाळ असल्याने विद्यार्थ्यांनी पुस्तकी अभ्यासासोबतच कला साधनेलाही तितकेच महत्त्व द्यावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात प्रवीण दवणे यांनी विद्यार्थ्यांना कविता सूचण्यामागचा मनोहारी अनुभव अगदी ओघवत्या व सहज-सोप्या शैलीत उलगडून दाखवला; तसेच ग. दि. माडगूळकर यांच्या अजरामर ‘गीत रामायण’मधील साहित्याचा अवीट गोडवा अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्याचे नियमित श्रवण करावे आणि कोकणातील समृद्ध साहित्यिकांच्या दर्जेदार ग्रंथांचे वाचन करावे, असा मोलाचा सल्ला दिला. दीपप्रज्ज्वलनाने सुरू झालेल्या या सोहळ्यात मुख्याध्यापक राजन कीर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रज्ञा दामले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली; याप्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर यांच्या हस्ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे आणि कोकण युवा मोर्चाचे प्रमुख अरुण मोरये यांचा गौरव करण्यात आला. या साहित्यिक मेळाव्याला संस्थेचे सचिव राजीव गोगटे, मुख्याध्यापक राजन कीर, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये यांच्यासह आजी-माजी शिक्षक आणि मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते; कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन विजय गावडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विलास पांचाळ यांनी मानले.

Total Visitors :

5468412
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व १६ प्रभागांतील सफाई कामगारांना दिवाळी फराळाचे वाटप

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी : लॉजच्या आवारातील क्रूझर पेटवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण : कादवड येथे कौटुंबिक वादातून भावावर लाकडी दांडक्याने हल्ला; डोके फोडून जीवे मारण्याची धमकी

Gramin Varta
2 Min Read

दिल्लीत सामूहिक अत्याचारानंतर मुलीची हत्या

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची यशस्वी मोहोर

2 Min Read
रत्नागिरी

ब्रेकिंग: लांजा, खेड आणि मंडणगडसह राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; राज्य शासनाचा मोठा निर्णय

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर ठाकरे शिवसेना आक्रमक; प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा सिव्हिल प्रशासनाला थेट इशारा

2 Min Read
रत्नागिरी

‘महानगर गॅस कनेक्शन बंद होणार’ असा बनावट संदेश पाठवून फसवणूक; रत्नागिरी पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?