ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पती-पत्नीतील मतभेद म्हणजे क्रूरता नव्हे; ठोस पुराव्यांशिवाय घटस्फोट मिळणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पती-पत्नीतील मतभेद म्हणजे क्रूरता नव्हे; ठोस पुराव्यांशिवाय घटस्फोट मिळणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
देश-विदेश

पती-पत्नीतील मतभेद म्हणजे क्रूरता नव्हे; ठोस पुराव्यांशिवाय घटस्फोट मिळणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Gramin Varta
Last updated: November 7, 2026 8:32 am
Gramin Varta
52 Views
Share

नागपूर : वैवाहिक आयुष्यात पती-पत्नीमध्ये होणारे मतभेद, भांडणे किंवा किरकोळ कुरबुरी यांना थेट कायदेशीर क्रूरतेचा दर्जा देता येणार नाही. घटस्फोटासारखा महत्त्वाचा निर्णय केवळ सर्वसाधारण आरोपांच्या आधारे घेता येत नाही, त्यासाठी संबंधित आरोपांच्या समर्थनार्थ ठोस पुरावे असणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. या प्रकरणात पत्नीविरोधात क्रूरतेचे आरोप करणाऱ्या पतीची घटस्फोटाची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

नागपूर येथील एका व्यक्तीचा उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे १० मे २००७ रोजी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन अपत्ये असून त्यांचे वय अनुक्रमे १२ आणि ८ वर्षे आहे. वैवाहिक संबंधांमध्ये कटुता निर्माण झाल्यानंतर पतीने न्यायालयात धाव घेत घटस्फोटाची मागणी केली होती. पत्नीला एका डोळ्याने दिसत नसून तिला मानसिक आजार असल्याची बाब विवाहापूर्वी आपल्यापासून लपवण्यात आली होती, असा दावा त्याने केला होता. याशिवाय पत्नीच्या सततच्या वादविवादामुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्याचे म्हणणे होते.

पतीने आपल्या याचिकेत २०१७-१८ च्या सुमारास पत्नी माहेरी गेल्यानंतर पुन्हा नांदण्यासाठी परतली नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. पत्नीच्या वर्तनामुळे वैवाहिक जीवन असह्य झाल्याचा दावा करत त्याने विवाहबंधनातून मुक्त करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र, सुनावणीदरम्यान पत्नीच्या बाजूने मांडण्यात आलेली भूमिका आणि सादर करण्यात आलेले पुरावे यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

पत्नीच्या वडिलांनी न्यायालयात साक्ष देताना मुलीने केवळ पतीचीच नव्हे, तर सासू-सासऱ्यांचीही जबाबदारी पार पाडल्याचे सांगितले. तसेच पतीचे अन्य महिलेशी संबंध असल्यामुळे त्याला पत्नीपासून विभक्त व्हायचे होते, असा आरोपही त्यांनी केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि उपलब्ध कागदपत्रांची छाननी केली असता, पत्नी स्वतःहून माहेरी निघून गेली नव्हती, तर पतीनेच तिला माहेरी सोडल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय पत्नीने आपल्यावर क्रूरता केल्याचा आरोप करणाऱ्या पतीला अशा कथित घटनांचा ठोस तपशील न्यायालयासमोर मांडता आला नाही. नेमकी कोणती घटना घडली, ती कधी घडली आणि कुठे घडली, याबाबत याचिकेत स्पष्टता नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे केवळ आरोप करून पत्नीच्या वर्तनाला कायदेशीर क्रूरता ठरवता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण झाला आहे किंवा पती-पत्नीमधील संबंध पूर्ववत होण्याची शक्यता कमी आहे, एवढ्याच कारणावरून घटस्फोटाचा आदेश देता येत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले. वैवाहिक संबंधांमधील सामान्य स्वरूपाचे मतभेद आणि कायद्याच्या दृष्टीने सिद्ध होणारी क्रूरता यामध्ये फरक असल्याचे न्यायालयाच्या निरीक्षणातून अधोरेखित झाले.

न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवत पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली. वैवाहिक वादांमध्ये केवळ आरोपांपेक्षा वस्तुस्थिती आणि पुराव्यांना अधिक महत्त्व असल्याचा संदेश या निर्णयातून मिळत असून, पती-पत्नीमधील प्रत्येक मतभेदाला क्रूरतेचे स्वरूप देता येणार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Total Visitors :

5469285
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

हातखंबा तिठा-गाव मार्गावरील धोकादायक उतार ठरतोय अपघातांचा सापळा; गतिरोधकासह सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी

Gramin Varta
2 Min Read

गुहागर तालुक्यातील तळवली परिसरात बिबट्याची दहशत; वनविभागाकडून पाहणी करत ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

Gramin Varta
1 Min Read

महामार्ग प्राधिकरणाचा अनागोंदी कारभार! कागदावर ‘प्रोजेक्ट प्लॅन’, प्रत्यक्षात मात्र भलताच प्रकार

Gramin Varta
3 Min Read

राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ३५ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता; पुढील आठवड्यापासून वितरणाची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

देश-विदेश

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाची सुनावणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे संकेत

2 Min Read
देश-विदेश

आयटीबीपीच्या जवानांनी सर केले ‘माऊंट-एबी’ शिखर;तब्बल 24,131 फुटांवर रोवला

2 Min Read
देश-विदेश

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायतींची भूमिका अधिक बळकट होणार

4 Min Read
देश-विदेश

ध्रुव राठींचा थेट रस्त्यावर उतरून पंतप्रधान मोदींसह ज्ञानेश कुमारांवर घणाघात

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?