ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कलगी तुरा समाज उन्नती मंडळातर्फे मुंबईत १४ नोव्हेंबरला शाहिरांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर व मुक्त संवाद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कलगी तुरा समाज उन्नती मंडळातर्फे मुंबईत १४ नोव्हेंबरला शाहिरांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर व मुक्त संवाद
महाराष्ट्र

कलगी तुरा समाज उन्नती मंडळातर्फे मुंबईत १४ नोव्हेंबरला शाहिरांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर व मुक्त संवाद

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 7:19 pm
Gramin Varta
177 Views
Share

मुंबई (उदय दणदणे): महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या कलगी-तुरा शाहिरी परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कलगी तुरा समाज उन्नती मंडळाने पुढाकार घेतला आहे. कलेच्या क्षेत्रात गेली साडेसहा दशके अखंड कार्यरत असलेल्या या मातृसंस्थेच्या वतीने शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील दादर येथे शाहिरी लोककलावंतांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर आणि मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शांताराम भाऊ फिलसे फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित हा मेळावा दादर पश्चिमेकडील सेनापती बापट मार्गावरील श्री संत सेना सभागृहात सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत पार पडणार आहे.

‘काल, आज आणि उद्या’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या एकदिवसीय शिबिरात कलगी-तुरा परंपरेतील विविध घटकांचे सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये गण, गौळण व पद्यांचा समावेश असलेला कविता विभाग, पारंपरिक जाखडी नृत्य आणि रंगबाजी अशा प्रमुख अंगांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाईल. केवळ सादरीकरणापुरते मर्यादित न राहता, कलगी-तुरा परंपरेचा मूळ गाभा टिकवून हा वारसा नव्या पिढीपर्यंत कसा पोहोचवावा, यावरही मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रशिक्षणासोबतच शाहिरी कलेसमोरील सद्यस्थिती आणि आव्हानांवर मात करण्यासाठी विचारमंथन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या मुक्त संवादात कलगी-तुरा लोककलेचा वारसा, कलाकारांचे रोजचे प्रश्न, आर्थिक स्थैर्य आणि कलेचा आधुनिक संदर्भातील विकास या विषयांवर नामवंत अभ्यासक, वस्ताद आणि ज्येष्ठ शाहीर चर्चा करणार आहेत. या सामूहिक मंथनातून लोककलेच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस दिशा ठरवली जाणार आहे.

कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या कलाकारांची आणि पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपस्थित राहणाऱ्या प्रतिनिधींना भोजन कुपन दिली जाणार आहेत. या ऐतिहासिक मेळाव्यास राज्यातील सर्व शाहीर, कलावंत, मार्गदर्शक, अभ्यासक आणि लोककला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुरेश ऐनारकर, सरचिटणीस संतोष धारशे आणि खजिनदार सत्यवान यादव यांनी केले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी व पूर्वनोंदणीसाठी चिटणीस दिलीप नामे (७०२१४ ५२३०५)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Total Visitors :

5470149
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शिवसेना चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सर्व शक्य चाचण्यांचा विचार करून निर्णय घेतलाय

Gramin Varta
4 Min Read

मंडणगड : सडे जाधववाडी येथे कुत्रा मारल्याच्या संशयावरून वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

कामगार हक्कांच्या लढ्याला सन्मान; अनिल जाधव यांना ‘सह्याद्री जीवनगौरव पुरस्कार’

Gramin Varta
2 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

ढोंगी बाबाचा संतापजनक विकृत चेहरा उघड; पुण्यात सेवेच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार, संत इंद्रदेव महाराजाविरोधात गुन्हा दाखल

2 Min Read
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ अन् ई-केवायसीला मुदतवाढ मिळणार? मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता

2 Min Read
महाराष्ट्र

दिल्ली पाठोपाठ मुंबईत हाय हॉल्टेज!शिवसेना भवनाबाहेर ठाकरे बंधूंचा आक्रमक पवित्रा, मुंबईत तणाव

3 Min Read
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; शासनाकडुन ७५०० कोटींच्या मदतीची घोषणा

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?