ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: नवी मुंबईचा देशात डंका; ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये ४,७५१ शहरांना मागे टाकत पटकावला प्रथम क्रमांक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Thursday, Nov 12, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » नवी मुंबईचा देशात डंका; ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये ४,७५१ शहरांना मागे टाकत पटकावला प्रथम क्रमांक
महाराष्ट्र

नवी मुंबईचा देशात डंका; ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये ४,७५१ शहरांना मागे टाकत पटकावला प्रथम क्रमांक

Gramin Varta
Last updated: November 12, 2026 9:47 am
Gramin Varta
Share

नवी मुंबई: देशातील स्वच्छ शहरांच्या क्रमवारीत सातत्याने आघाडीवर राहणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने यंदा स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठले आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये देशातील तब्बल ४,७५१ शहरांमधून प्रथम क्रमांक पटकावत नवी मुंबईने देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहर होण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात बुधवारी पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेच्या कामात सातत्यपूर्ण सुधारणा करण्यावर भर दिला होता. हा सन्मान स्वीकारल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी संपूर्ण नवी मुंबईकरांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत, हा पुरस्कार शहरातील नागरिक, स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखी यांना समर्पित केला. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान या यशात सर्वात मोलाचे असल्याचे नमूद करत, आगामी काळात ‘सुगंधी शहर अभियान’च्या माध्यमातून स्वच्छतेच्या कार्याला अधिक गती दिली जाईल, असा विश्वास उपमहापौर दशरथ भगत यांनी व्यक्त केला. तर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या कामगिरीचे श्रेय नागरिक आणि स्वच्छताकर्मींच्या एकत्रित प्रयत्नांना दिले.

स्वच्छ भारत मिशन-शहरीअंतर्गत नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये आपले स्थान कायम राखण्यासोबतच सप्ततारांकित कचरामुक्त शहर (जीएफसी) आणि ‘वॉटर प्लस’ प्रमाणपत्राचा बहुमानही अबाधित ठेवला आहे. दैनंदिन स्वच्छता, कचऱ्याचे शास्त्रीय वर्गीकरण आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी एकात्मिक नियंत्रण व देखरेख केंद्रासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. याशिवाय वस्त्र कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणारे देशातील पहिले केंद्र यशस्वीपणे चालविणे, पाण्याचा पुनर्वापर, प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणि ‘मायएनएमएमसी’ ॲपद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करणे अशा अनेक उपक्रमांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. विद्यार्थी व युवकांचा सहभाग आणि प्रशासनाची जिद्द या जोरावर मिळवलेला हा प्रथम क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी आगामी काळातही स्वच्छतेतील हे सातत्य कायम राखण्याची जबाबदारी महापालिकेवर असणार आहे.

Total Visitors :

5470973
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लाल, निळा, पिवळा अन् नारंगी; रेल्वे डब्यांच्या रंगांमागे दडलंय नेमकं कोणतं विज्ञान?

Gramin Varta
2 Min Read

पुर्ये तर्फे देवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्याचे मोठे नुकसान, वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Gramin Varta
2 Min Read

स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारताचा ३-० ने मालिका विजय; हरमनप्रीत कौरच्या वादळी नाबाद ९१ धावांमुळे झिम्बाब्वेचा ९२ धावांनी धुव्वा

Gramin Varta
2 Min Read

दापोली-मंडणगड-खेड विधानसभा क्षेत्रासाठी बसपाची नवी कार्यकारिणी जाहीर

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दुष्काळात गाव सुटले तरी हक्काचे अन्नधान्य मिळणारच; स्थलांतरितांसाठी राज्यभरातील रास्तभाव दुकाने खुली

2 Min Read
महाराष्ट्र

अवघ्या ७ हजारांचे केले ७० हजार, भरचौकातून बापाला उचलून नेलं अन् भल्या पहाटे फायनान्सच्या बंद कार्यालयात संशयास्पद मृत्यू

2 Min Read
महाराष्ट्र

काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू, चौघे जखमी

2 Min Read
महाराष्ट्र

महिला शेतकऱ्यांना अधिकृत सन्मान; राज्यभरात प्रमाणपत्र नोंदणी व वितरणाची धडक मोहीम सुरू, १७ ऑक्टोबरपर्यंत संधी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?