ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबईत भरदिवसा गोळीबाराचा थरार; कुर्ल्यात पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या, नातेवाईकांचा पोलीस ठाण्याबाहेर आक्रोश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Thursday, Nov 12, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबईत भरदिवसा गोळीबाराचा थरार; कुर्ल्यात पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या, नातेवाईकांचा पोलीस ठाण्याबाहेर आक्रोश
महाराष्ट्र

मुंबईत भरदिवसा गोळीबाराचा थरार; कुर्ल्यात पूर्ववैमनस्यातून एकाची हत्या, नातेवाईकांचा पोलीस ठाण्याबाहेर आक्रोश

Gramin Varta
Last updated: November 12, 2026 9:48 am
Gramin Varta
Share

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात बुधवारी दुपारी भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माकडवाला कंपाउंड परिसरात दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी विनोद मल्लापा पवार (वय ४०) यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विनोद पवार यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून या घटनेमुळे परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर मृत विनोद पवार यांच्या संतप्त नातेवाईकांनी कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत प्रचंड आक्रोश व्यक्त केला. संशयित आरोपी नेहल पवार याला आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली. तसेच एका महिला नातेवाईकाने थेट फोटो दाखवून या हत्येमागे चार आरोपी असल्याचा गंभीर दावा केला. यापूर्वीही त्यांचाच हात होता आणि आताही त्यांनीच हे कृत्य केले असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत आरोपींचे एन्काउंटर होत नाही किंवा त्यांना फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही आणि त्यासाठी वर्षभर पोलीस ठाण्यासमोर उभे राहावे लागले तरी चालेल, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी पूर्ववैमनस्यातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, प्राथमिकदृष्ट्या यामध्ये दोन आरोपींचा सहभाग दिसून येत आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची एकूण १२ पथके रवाना करण्यात आली असून तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे सखोल तपास सुरू आहे. परिसरातील तणाव लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Total Visitors :

5470974
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चाफेरी सहानवाडीत १५ वर्षांपासून कोजागिरी पौर्णिमा व दीपोत्सवाची परंपरा कायम

Gramin Varta
2 Min Read

ताम्हिणी घाटात ढग उतरले जमिनीवर; रायगडच्या निसर्गसौंदर्याचा अद्भुत नजारा अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे जुनी शाळा थांब्यावर अपघातांची टांगती तलवार; गतीरोधक बसवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

Gramin Varta
2 Min Read

खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक बॅट्स आता मुंबई क्रिकेट संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवल्या जाणार

2 Min Read
महाराष्ट्र

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार १२ हजार रुपये

2 Min Read
महाराष्ट्र

‘दुःखी कसं राहायचं?’ केतनच्या मृत्यूनंतर सियाचा ChatGPTला सवाल; चार्जशीटमधील उल्लेखाने खळबळ

3 Min Read
महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या ‘गर्जना’ मोर्चाचा बदलला मार्ग; मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?