ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर
राजापूर

जमीन संपादन व मोबदला वाटपात गैरव्यवहार; एसआयटी चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवा : मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 8:49 pm
Gramin Varta
470 Views
Share

राजापूर/ तुषार पाचलकर: महामार्गासाठी किंवा विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या जमीन संपादन आणि त्यापोटी दिल्या जाणाऱ्या मोबदला वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल एसआयटी (SIT) चौकशी सुरू असून, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत प्रशासनाने घाईघाईत कोणतीही जागा ताब्यात घेऊ नये आणि मोबदला वाटप करू नये, अशी परखड भूमिका मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी मांडली आहे.

संबंधित अधिकारी आणि मध्यस्थ दलालांच्या संगनमताने नियमबाह्य पद्धतीने मोबदला लाटण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी काही ठरावीक लोकांना शेकडो पटीने अतिरिक्त मोबदला दिल्याचा संशय असून, म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी लावली गेली आहे. असे असतानाही, मूळ चौकशीचा अहवाल येण्याआधीच अधिकारी व दलाल इतर जमिनींच्या संपादन प्रक्रियेत आणि मोबदला वितरणात अवाजवी घाई करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ब्राह्मण खोरे आणि सांडवे खोरे या भागातील जमिनींच्या भूसंपादनावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. महाड दुर्घटनेच्या वेळी डोंगराच्या पायथ्याशी असलेली घरे कोसळल्याची पार्श्वभूमी असताना, डोंगराच्या पायथ्याशी पुनर्वसन किंवा प्रकल्प उभारू नयेत, असे स्पष्ट निर्देश होते. तरीही या खोऱ्यातील जागा ताब्यात घेऊन नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा घाट घातला जात आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय, प्रत्यक्ष जागेवर नसलेली खोटी झाडे कागदावर दाखवून मोबदला लाटण्याचा प्रकारही घडल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी कोणत्याही दलालांच्या किंवा अधिकाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा संपूर्ण आणि योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, यात दुमत नाही; परंतु दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची ही लूट त्वरित थांबली पाहिजे.

शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक खपवून घेतली जाणार नसून, या संपूर्ण लढ्यात आपण १०० टक्के शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा निर्धारही मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी व्यक्त केला आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल

Gramin Varta
2 Min Read

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार १२ हजार रुपये

Gramin Varta
2 Min Read

देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रातील अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन

Gramin Varta
1 Min Read

Inside Amazon’s Bold Vision for the Future of Shipping

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर रेल्वे स्थानकाबाहेर संशयास्पद बॅगेसह एकजण ताब्यात

2 Min Read
राजापूर

राजापूर पालिकेतर्फे 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत योग प्रशिक्षण शिबिर

1 Min Read
राजापूर

राजापुरात बंद घर फोडून ६७ हजारांचा ऐवज लंपास

1 Min Read
राजापूर

जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?