ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चरवेली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चरवेली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान
रत्नागिरी

चरवेली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सावंत यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 11:36 am
Gramin Varta
Share

जाकादेवी : संविधान अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अहिल्यानगर येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात रत्नागिरी तालुक्यातील चरवेली गावचे सुपुत्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक प्रकाश गंगाराम सावंत यांना प्रतिष्ठेच्या ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या वतीने हा गौरव करण्यात आला.

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या या भव्य पुरस्कार वितरण समारंभास माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विधीतज्ज्ञ तथा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. मुकुंद भारसाकळे, संघराज रूपवते, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सावंत यांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रकाश सावंत यांनी विविध लोकप्रबोधन माध्यमे आणि लोककलांच्या माध्यमातून भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रचार-प्रसार केला आहे. दुर्लक्षित घटकांमध्ये सामाजिक जनजागृती निर्माण करणे आणि सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे निस्वार्थी भावनेने अविरत कार्य केले आहे. त्यांच्या याच सामाजिक बांधिलकीची पावती म्हणून त्यांना या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सावंत म्हणाले की, हा सन्मान केवळ माझा नसून शिल्पकार सेवा संघ चरवेली, ग्रामस्थ, सामाजिक-धार्मिक संस्था, कलावंत आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले कुटुंबीय व हितचिंतक यांचा आहे. हा बहुमान मी त्या सर्वांना समर्पित करतो. भविष्यातही लोककल्याणकारी, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळींमध्ये अधिक ऊर्जेने काम करत राहण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

या उल्लेखनीय यशाबद्दल विविध सामाजिक संस्था, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि धम्मबांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल तक्षशिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पाली व धम्म क्रांती कला मंच, रत्नागिरी यांच्या वतीनेही प्रकाश सावंत यांचा विशेष नागरी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Total Visitors :

5427506
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Amazon Prime Day Sets New Record with Billions in Sales

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला

Gramin Varta
3 Min Read

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

राजापूर: एसटी बसमधून महिलेच्या बॅगेतील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम यंत्र दाखल; प्रवाशांची तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमधून कायमची सुटका

2 Min Read
रत्नागिरी

दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय अखेर कार्यान्वित; दापोली, खेड आणि मंडणगडवासीयांची पायपीट थांबणार!

2 Min Read
रत्नागिरी

कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा भव्य मूक मोर्चा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?