ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी

रत्नागिरीत जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 8:25 am
Gramin Varta
31 Views
Share

रत्नागिरी: रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था आणि समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई) तसेच पर्यटन संचालनालयातर्फे जागतिक पर्यटन दिन आज रत्नागिरीत उत्साहात साजरा झाला.

येथील हॉटेल विवा येथे झालेल्या या कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर, समृद्ध कोकणचे संस्थापक संजय यादवराव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, पर्यटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभात पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्हा आता गोव्याप्रमाणेच पर्यटकांना आकर्षित करत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. हॉटेल व फळप्रक्रिया या व्यवसायांना उद्योगांचा दर्जा द्यायचा आहे. असा दर्जा दिला तर त्यात आमूलाग्र बदल होईल. पुढील दोन वर्षांत पर्यटनाची माहिती देणारे पर्यटन विकास केंद्रही विकसित करण्यात येणार आहे.

श्री. सामंत यांनी राजू भाटलेकर यांचे अभिनंदन केले. सातत्याने पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणारे भाटलेकर पर्यटन परिषद, कार्यशाळा घेऊन व्यासपीठ देत असल्याचे सांगून ते म्हणाले की, रत्नागिरीत दिवाळी, ३१ डिसेंबर, शिमगा, गणपती उत्सव आदी काळात हॉटेल्सची ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत हॉटेल्स फुल्ल होती. रत्नागिरीत विमानतळ होणार का, यावर एकेकाळी शंका उपस्थित करून टीका केली जात होती. मात्र १७० कोटी रुपये खर्च करून येथील एअरस्ट्रिपची लांबी १४०० मीटरवरून २१०० मीटर आणि रुंदी ३० मीटरवरून ४५ मीटर करण्यात आली आहे. येथे ८२ सीटर एटीआर विमान सहज उतरू शकेल, जेणेकरून पर्यटनाला अधिक गती मिळेल. उडान योजनेअंतर्गत देशात कुठेही पाहायला मिळणार नाही, अशी सुसज्ज टर्मिनल बिल्डिंग रत्नागिरीत उभारण्यात आली आहे. या इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडते. पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक पातळीवर मैत्री ग्रुपने तयार केलेला कॉर्न- चीज सामोसा यांसारख्या नवीन पदार्थांची आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांची भर पडत आहे.

रत्नागिरी विमानतळावरून आगामी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होणार असून, नागरिक विमानाने प्रवास करू शकतील, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.

प्रास्ताविकामध्ये सुधीर तथा भाई रिसबूड यांनी कोकणचे पर्यटन, रत्नागिरीत पर्यटनवाढीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या कलाकृती, प्रकल्पांबाबत माहिती दिली. फक्त संकल्पना मांडून नाही तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यावर पालकमंत्र्यांचा भर असतो, असे आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आयरे यांनी केले.

यावेळी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी मंत्री सामंत यांना विशेष पर्यटन मित्र सन्मान प्रदान केला. सुदेश शेट्ये, सतीश कदम, संजय वैशंपायन, सौ. अमृता करंदीकर, ययाती शिवलकर, गौरेश फाळके, गौरव जोशी, महेंद्र मयेकर, प्रसाद देवस्थळी, ओम पाडाळकर, राधेय पंडित, सौ. शहनाज काझी, मानसी यादवराव, आनंद तायशेटे, भरत मोरे यांना पर्यटन मित्र पुरस्कार, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या मागणीसाठी ७ ऑक्टोबरला इंडिया आघाडीचा मोर्चा

Gramin Varta
2 Min Read

कोकणाच्या हापूससह सर्व आंबा जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार

Gramin Varta
2 Min Read

आज १ ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे मोठे बदल; जाणून घ्या नवे नियम लागू

Gramin Varta
3 Min Read

मुंबई-गोवा महामार्गावर सप्तलिंगी पुलाजवळ कारचा भीषण अपघात; सुदैवाने तिघे बचावले

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

रत्नागिरी

रत्नागिरी : राहत्या घरातून विवाहित महिला बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

‘ग्रामीण वार्ता’ची दखल: नाचणे ग्रामपंचायत हद्दीतील ‘तो’ धोकादायक खड्डा २४ तासांत काँक्रीटने बुजवला

1 Min Read
रत्नागिरी

पावसाअभावी भातशेती संकटात; जिल्हाधिकाऱ्यांकडून थेट बांधावर जाऊन पाहणी

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?