ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कोकणाच्या हापूससह सर्व आंबा जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कोकणाच्या हापूससह सर्व आंबा जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार
महाराष्ट्र

कोकणाच्या हापूससह सर्व आंबा जातींची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद होणार

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 7:07 pm
Gramin Varta
82 Views
Share

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मागणीची शासनाकडून तातडीने दखल

मुंबई : कोकणची ओळख असलेल्या हापूस आंब्यासह महाराष्ट्रातील प्रमुख आंबा जातींची ई-पीक पाहणीमध्ये स्वतंत्रपणे नोंद होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्याचे उद्योग, गुंतवणूक व सेवा तसेच मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या मागणीची शासनाने तातडीने दखल घेत यासंबंधीचे पत्र जारी केले आहे.

चालू वर्षी शासनामार्फत DCS अॅपद्वारे ई-पीक पाहणी करण्यात येत आहे. मात्र, या अॅपमध्ये आंबा पिकाची नोंद करताना हापूस, केशर, रत्ना, सिंधु, पायरी यासारख्या प्रमुख जाती स्वतंत्रपणे उपलब्ध नव्हत्या. परिणामी, प्रत्यक्ष शेतात असलेल्या आंबा पिकाची अचूक नोंद करणे सहायकांना शक्य होत नव्हते. कोकणची ओळख हापूस आंब्यामुळे असूनही त्याचाच अॅपमध्ये समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना होती.

डॉ. उदय सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला मुद्दा
ही बाब लक्षात घेऊन डॉ. सामंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न ठामपणे उपस्थित केला. यावेळी त्यांनी निदर्शनास आणले की, ई-पीक पाहणीसाठी वापरल्या जाणाऱ्या अॅपमध्ये “कोकण रुची” या नावाने पर्याय दिसत असल्याने, इतर आंबा जाती तसेच कोकणातील अन्य फळपिकांचे सर्वेक्षण प्रत्यक्षात होत नव्हते. या मागणीची दखल घेत शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. त्यानुसार DCS अॅपमध्ये पुढील बाबींचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे:

महाराष्ट्रातील प्रमुख आंबा जाती – हापूस, केशर, रत्ना, सिंधु, पायरी
काजू, नारळ व सुपारी या फळपिकांच्या सर्व जाती
ई-पीक पाहणी करताना आवश्यक पर्याय निवडण्याची सोय
शेतकऱ्यांना होणारा फायदा

या निर्णयामुळे आंबा, काजू, नारळ व सुपारी बागायतदारांच्या पिकांची अचूक नोंद सातबारा उताऱ्यावर होण्यास मदत होईल. पीक नुकसानभरपाई, पीक विमा, शासकीय योजनांचे लाभ तसेच नियोजनासाठी विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध होण्यासही हातभार लागेल.

“हापूस ही कोकणची शान आहे आणि कोकणातील बागायतदार हा या भागाच्या अर्थकारणाचा कणा आहे. आपल्या पिकाची योग्य आणि स्वतंत्र नोंद व्हावी, ही शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा होती. मंत्रिमंडळ बैठकीत मी ही मागणी केल्यानंतर शासनाने त्याची तातडीने दखल घेतली, याचे मला समाधान आहे. यामुळे कोकणातील फळबागायतदारांना न्याय मिळेल आणि ई-पीक पाहणी अधिक अचूक व पारदर्शक होईल,” अशी प्रतिक्रिया डॉ. सामंत यांनी व्यक्त केली.

कोकणातील आंबा बागायतदार, शेतकरी संघटना व संबंधित संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी : विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहा – अरांक्षा यादव

Gramin Varta
2 Min Read

घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जी खपवून घेणार नाही; तारीखनिहाय अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

Scaling Peaks the Awe-Inspiring Beauty of High Altitude Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

एसआयआर प्रक्रिया रद्द करून नव्याने करा; बॅलेट पेपरसाठी सर्व पक्षांनी आंदोलन उभारावे – राज ठाकरे

2 Min Read
महाराष्ट्र

घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर ८५ वर्षीय वृद्धाचा लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

2 Min Read
महाराष्ट्र

एसआयआरच्या मुद्द्यावरून ४ ऑक्टोबरला मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंचा संयुक्त जनमोर्चा

2 Min Read
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणात ७० वर्षीय नराधमाला फाशीची शिक्षा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?