ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘कॅम्पस से संसद’ उपक्रमासाठी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या अनुष्का पर्शराम हिची निवड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘कॅम्पस से संसद’ उपक्रमासाठी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या अनुष्का पर्शराम हिची निवड
संगमेश्वर

‘कॅम्पस से संसद’ उपक्रमासाठी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या अनुष्का पर्शराम हिची निवड

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 2:08 pm
Gramin Varta
126 Views
Share

देवरूख: देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. अनुष्का संदीप पर्शराम हिची नवी दिल्ली येथे आयोजित ‘कॅम्पस से संसद’ या विशेष अभ्यास उपक्रमासाठी निवड झाली आहे. राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत अनुष्काला देशाच्या नव्या संसद भवनास प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडल्या गेलेल्या अवघ्या ३१ विद्यार्थ्यांमध्ये अनुष्काचा समावेश असून, तिने या राष्ट्रीय उपक्रमात रत्नागिरी जिल्ह्याचा झेंडा फडकावला आहे.

या उपक्रमासाठी राज्यभरातील विविध महाविद्यालयांमधून लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन अत्यंत चुरशीच्या टप्प्यांतून निवड प्रक्रिया पार पडली. देवरूख महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला होता. महाविद्यालयाच्या आबासाहेब व कमलाबाई सरदेशपांडे ग्रंथालयात घेण्यात आलेल्या लेखी प्रश्नमंजुषा फेरीत अव्वल ठरलेल्या ५ विद्यार्थ्यांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली. त्यानंतर मुंबईहून आयोजकांनी घेतलेल्या ऑनलाइन मुलाखतीमध्ये अनुष्का पर्शराम हिने चमकदार कामगिरी करत दिल्ली दौऱ्याचे तिकीट पक्के केले.

आठवडाभर चालणाऱ्या या विशेष अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना नव्या संसद भवनासोबतच राष्ट्रपती भवन, राष्ट्रीय युद्ध स्मारक यांसारख्या ऐतिहासिक व राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची आणि विविध महत्त्वाच्या आस्थापनांमधील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची मौल्यवान संधी मिळणार आहे. निवड प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रा. स्नेहलता पुजारी, प्रा. संदीप मुळ्ये आणि प्रा. शिवराज कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

अनुष्काच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, पदाधिकारी नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे मनापासून अभिनंदन केले असून तिच्या पुढील दिल्ली अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर कनकाडीतील उपोषण तात्पुरते स्थगित

Gramin Varta
2 Min Read

अल निनोच्या तडाख्याने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर दुष्काळाच्या छायेत, भातशेतीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट

Gramin Varta
3 Min Read

रत्नागिरीतील वंचित सहा तालुक्यांचा तातडीने दुष्काळात समावेश करा; आमदार भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Gramin Varta
2 Min Read

देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार का बोलत नाहीत? गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांचा सवाल

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

2 Min Read
संगमेश्वर

नायरी गावात मोबाईल नेटवर्कचा पुरता बोजवारा; सेवा पूर्ववत न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा

2 Min Read
संगमेश्वर

Probing the Frontiers of Understanding and Treating Brain Disorders

7 Min Read
संगमेश्वर

Unraveling the Complexities of the Human Mind and Behavior

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?