ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल
लांजा

लांजा बसस्थानक परिसरात संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 9:02 am
Gramin Varta
262 Views
Share

लांजा : लांजा येथील एसटी बसस्थानक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला लांजा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत नामदेव सुतार (वय ३२, मूळ रा. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली, सध्या रा. जाकादेवी, ता. जि. रत्नागिरी) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लांजा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक देवकन्या विठ्ठल मैदाड व त्यांचे पथक गस्तीवर असताना, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास लांजा बसस्थानक परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो चोरी करण्याच्या उद्देशाने सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापर्यंतच्या कालावधीत परिसरात संशयित हालचाली करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पडताळणी केली असता, त्याच्यावर यापूर्वी सांगली जिल्ह्यातील विटा पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कायद्यांतर्गत तसेच मुंबई पोलीस कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद समोर आली आहे.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १२२ (ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कायदेशीर तरतुदीनुसार आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. पोलीस हवालदार उर्मिला शेंडे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार जान्हवी मांजरे करत आहेत. रात्रीच्या वेळी बसस्थानक व सार्वजनिक ठिकाणी अशा संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर लांजा पोलिसांची करडी नजर आहे.

Total Visitors :

5469379
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जाकादेवीत १४ नोव्हेंबरला हार्मोनियम, ढोलकी वादन प्रशिक्षण कार्यशाळा

Gramin Varta
1 Min Read

कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेत वाढ करण्याची गरज; दिवेआगार दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचल विद्यालयाचे वर्चस्व; १७ वर्षांखालील मुलांचा संघ प्रथम, जिल्हा पातळीवर निवड

Gramin Varta
1 Min Read

मंडणगड : सडे जाधववाडी येथे कुत्रा मारल्याच्या संशयावरून वृद्धाला काठीने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित

2 Min Read
लांजा

लांजा : नौशाद नेवरेकर यांची मस्जिद ए अब्बास ट्रस्टच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

1 Min Read
लांजा

लांजा: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेचे ९० हजारांचे मंगळसूत्र लुटले

2 Min Read
लांजा

लांजा: वाकेड घाटात ‘बर्निंग कार’चा थरार! स्कॉर्पिओच्या धडकेनंतर ऑरा कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?