ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नांतून ५० अंगणवाडी केंद्रे व १० जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक डिजिटल शिक्षण सुविधा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नांतून ५० अंगणवाडी केंद्रे व १० जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक डिजिटल शिक्षण सुविधा
चिपळूण

आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नांतून ५० अंगणवाडी केंद्रे व १० जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक डिजिटल शिक्षण सुविधा

Gramin Varta
Last updated: October 26, 2026 4:11 pm
Gramin Varta
187 Views
Share

सावर्डे / विनायक सावंत : कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात एका क्रांतिकारी पर्वाची सुरुवात झाली आहे. आमदार शेखरजी गोविंद निकम यांच्या विशेष प्रयत्नांतून Clean India Technology आणि Teach Know Pvt. Ltd. यांच्या संयुक्त सहकार्याने ५० अंगणवाडी केंद्रे आणि १० जिल्हा परिषद शाळांमध्ये हायटेक डिजिटल शैक्षणिक सुविधा पुरविण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्यक्ष सुरू करण्यात आला आहे. कोकणात सर्वप्रथम राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाला आधुनिकतेची नवी दिशा लाभणार आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये अद्ययावत व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) लॅब, ५५ इंची इंटरॲक्टिव्ह डिजिटल पॅनेल आणि बालभारती अभ्यासक्रमावर आधारित ई-लर्निंग सॉफ्टवेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अत्याधुनिक व्हीआर तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना अवघड शैक्षणिक संकल्पना आभासी अनुभवाच्या माध्यमातून अतिशय सोप्या, मनोरंजक व अनुभवाधारित पद्धतीने शिकता येणार आहेत. अंगणवाडी पातळीवरही चिमुकल्यांसाठी ३डी ए.आय. अंगणवाडी आणि इंटरॲक्टिव्ह एज्युकेशनल मॅटसारख्या आधुनिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. कोयना भूकंप विकास समितीमार्फत या ५० अंगणवाडी केंद्रांसाठी ९० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यातून अँड्रॉइड प्रणाली, वेब कॅमेरा, वायरलेस कीबोर्ड-माउस, ३०३ शैक्षणिक कार्डे आणि पूरक सॉफ्टवेअर ही सामग्री पुरविण्यात आली आहे. या डिजिटल साधनांमुळे बालकांच्या पूर्वप्राथमिक अध्ययनात मोठी रुची आणि जिज्ञासा निर्माण होणार आहे.

या ऐतिहासिक प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच अंगणवाडी सेविकांना आमदार शेखरजी निकम आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी सातारा येथील स्टार एज्युस मार्ट आणि क्लीन इंडिया संस्था सांभाळत आहेत.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार शेखरजी निकम यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सावर्डे गटाच्या सदस्या पूजा निकम, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, प्रदेश सरचिटणीस जयंत खताते, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, सुशील भाईजे, संगमेश्वर पंचायत समितीचे उपसभापती प्रफुल्ल बाईक, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण, मनस्वी बैकर, इंगवले, सुवरे, साळवी, गव्हाळी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय गुजर, ज्येष्ठ नेते अशोकराव कदम, दशरथ दाभोळकर आणि गणपत कदम उपस्थित होते. तसेच प्रशासकीय पातळीवरून चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी इर्नाक, विस्तार अधिकारी देसाई, संगमेश्वरचे गटशिक्षणाधिकारी परीक्षा, महिला व बालकल्याण अधिकारी शिगवण, दिशा दाभोळकर, आदिती देशपांडे यांच्यासह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रशासक, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष देवराज गरगटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांनी मानले.

Total Visitors :

5468443
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मेर्वी गुरववाडी प्राथमिक शाळा इमारतीच्या प्रतीक्षेत;गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निधी देण्याची मागणी

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी: घाम गाळून पिकवलेली स्वप्नं दुष्काळाने गिळली; उरल्या फक्त रिकाम्या लोंब्या, अखेर डोळ्यांत अश्रू साठवून बळीराजाने स्वतःच्याच भातावर चालवला ग्रासकटर!

Gramin Varta
2 Min Read

‘सियाने लाथ मारली अन् चेतनने दरीत ढकललं!’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक जबाब

Gramin Varta
2 Min Read

चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पदरीत्या लपून बसलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

मोबाईलच्या नादात एसटी चालकाकडून प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ; चिपळूण-बेळगाव मार्गावरील संतापजनक प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी

2 Min Read
चिपळूण

अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन गोदामातून अ‍ॅल्युमिनिअम पत्रे व लोखंडी पाईप लंपास; एकावर गुन्हा दाखल

2 Min Read
चिपळूण

‘वारससेतू’ पोर्टलचे चिपळुणात लोकार्पण; वारस नोंदीसह शासकीय योजनांचे लाभ आता एकाच छताखाली

2 Min Read
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेची भव्य ‘सेवा ज्योत यात्रा’ बाईक रॅली उत्साहात; शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?