ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: जनगणना-२०२७ चा दुसरा टप्पा-लोकसंख्या गणनेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » जनगणना-२०२७ चा दुसरा टप्पा-लोकसंख्या गणनेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
महाराष्ट्र

जनगणना-२०२७ चा दुसरा टप्पा-लोकसंख्या गणनेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Gramin Varta
Last updated: October 13, 2026 8:20 am
Gramin Varta
94 Views
Share

मुंबई: जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेच्या कामाचे प्रभावी नियोजन करण्यासाठी राज्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच जनगणनेच्या वेळापत्रकानुसार या कामाचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली. बैठकीस समन्वय समिती सदस्य तथा शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका तथा केंद्र शासनाच्या सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, राज्यात जनगणना-२०२७ चा पहिला टप्पा म्हणजेच घरयादी व घरगणना मे-जून, २०२६ दरम्यान यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण, प्रगणक व पर्यवेक्षकांच्या समयोचित नियुक्त्या, प्रशिक्षणाची पुढील प्रक्रिया, स्व-गणना आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचे नियोजन करण्यात येत आहे. हे सर्व उपक्रम मार्च, २०२७ पर्यंत राज्यभर राबविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपापल्या कार्ययोजना जनगणनेच्या वेळापत्रकाशी सुसंगत ठेवून कामाचा वेग कायम राखावा, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.

दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी गृह रक्षक दल, वन विभाग, जिल्हा परिषद आणि शिक्षकांसह अन्य पात्र कर्मचाऱ्यांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हास्तरीय कार्यालयांनी नियुक्तीसाठी पात्र अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची यादी तयार करून संबंधित जनगणना चार्ज अधिकाऱ्यांकडे (तहसीलदार /मुख्याधिकारी / वॉर्ड अधिकारी) उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही मुख्य सचिव अग्रवाल यांनी दिल्या.

मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाने १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे जनगणना-२०२७ च्या दुसऱ्या टप्प्यात विचारण्यात येणाऱ्या ४० प्रश्नांची यादी अधिसूचित करण्यात आली आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात ३ सप्टेंबर २०२६ रोजी पुनर्प्रकाशित करण्यात आली आहे. जनगणनेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राज्यामध्ये स्थानिक पातळीवरील जनजागृती आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःची आणि कुटुंबाची स्व-गणना करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आवाहन करण्यात येणार आहे.

बैठकीत जनगणना कार्य संचालनालयाच्या संचालिका तथा केंद्र शासनाच्या सहसचिव डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी पहिल्या टप्प्यातील कामाचा आढावा, महत्त्वाचे निष्कर्ष आणि दुसऱ्या टप्प्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीच्या नियोजनाची माहिती समितीस दिली.

Total Visitors :

5469270
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील वीज व रस्त्यांच्या प्रश्नांवर राजवेल येथे संयुक्त बैठक; १० दिवसांत उपाययोजना करण्याचे महावितरणचे आश्वासन

Gramin Varta
3 Min Read

शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याच्या सूक्ष्म नियोजनावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Gramin Varta
6 Min Read

संपत्तीच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाचा घेतला जीव

Gramin Varta
1 Min Read

काळाचौकी महागणपती मंडपाजवळ विजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू, चौघे जखमी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मदतीचे तोरण बांधा

2 Min Read
महाराष्ट्र

मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर समन्वयातून सकारात्मक निर्णयांची मालिका; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वपूर्ण ग्वाही

5 Min Read
महाराष्ट्र

बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग पाच दिवस बँका बंद राहण्याची शक्यता, SBI कडून ग्राहकांना महत्त्वाची सूचना

2 Min Read
महाराष्ट्र

विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आक्रमक; आझाद मैदानावर राज्यभरातील हजारो कामगारांचे धरणे आंदोलन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?