ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आक्रमक; आझाद मैदानावर राज्यभरातील हजारो कामगारांचे धरणे आंदोलन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आक्रमक; आझाद मैदानावर राज्यभरातील हजारो कामगारांचे धरणे आंदोलन
महाराष्ट्र

विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आक्रमक; आझाद मैदानावर राज्यभरातील हजारो कामगारांचे धरणे आंदोलन

Gramin Varta
Last updated: October 23, 2026 8:38 am
Gramin Varta
27 Views
Share

मुंबई: विद्युत क्षेत्रातील तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि ज्वलंत समस्यांकडे शासन तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या (रजि. क्र. १०२९) नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर गुरुवारपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. ‘चलो मुंबई’च्या हाकेला प्रतिसाद देत रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि राज्यभरातून हजारो तांत्रिक कामगार या आंदोलनात एकवटल्याने आझाद मैदान परिसर ‘जय तांत्रिक’च्या घोषणांनी दणाणून गेला आहे. ४ सप्टेंबर १९७७ रोजी ‘एकता हीच शक्ती’ हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेली ही संघटना सातत्याने कामगारांच्या हक्कांसाठी लढत असून मागण्या पूर्ण होईपर्यंत हा एल्गार मागे न घेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची सुरक्षा, आवश्यक कामाचे साहित्य उपलब्ध करून देणे, कंपनी हिताच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करणे, दोन वेतनवाढींचा प्रलंबित लाभ देणे आणि उच्च पदाच्या लाभांसंदर्भात गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेली विसंगती दूर करणे या प्रमुख मागण्यांसाठी कामगार रस्त्यावर उतरले आहेत. याव्यतिरिक्त पूल सिस्टीमच्या नावाखाली होणारी कामगारांची पिळवणूक त्वरित थांबवणे, यंत्रचालक पदाची अंतर्गत भरती करणे, SEBC व ESBC प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे, विद्युत सहाय्यकांना इंधन व घरभाडे भत्ता देणे, महिला सहाय्यकांना संगोपन रजा मंजूर करणे आणि रिस्ट्रक्चरिंगची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे या मागण्यांचाही यात समावेश आहे. अहोरात्र आणि जीवावर उदार होऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवणाऱ्या तांत्रिक कामगारांच्या मूलभूत अधिकारांची शासन आणि प्रशासनाकडून होणारी उपेक्षा आता सहन केली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनादरम्यान मार्गदर्शन करताना संघटनेचे प्रादेशिक सहसचिव संजय भोसले यांनी दुर्लक्षित तांत्रिक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीच खाकी वर्दीतील नेतृत्वातून ही संघटना उभी राहिली असून ती कामगारांचे भविष्य उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला. या आंदोलनात रत्नागिरी विभागातून झोन अध्यक्ष किशोर साळुंखे, झोन उपाध्यक्ष महेंद्र पारकर, झोन सचिव महेंद्र शिवलकर आणि पतसंस्था सचिव राजेश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. न्याय्य हक्कांच्या या लढ्याला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असून यावर शासन व प्रशासन आता काय ठोस भूमिका घेते, याकडे सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5468548
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’त गुहागरच्या खामशेत ग्रामपंचायतीचा राज्यात डंका: पटकावला द्वितीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार

Gramin Varta
2 Min Read

अर्जुना धरणाच्या टेल चॅनेल खालील पाचल-तळवडे पुलाच्या बांधकामास मंजुरी; आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश, जामदा खोऱ्यातील नागरिकांत समाधान

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण: प्रा. अजित कदम यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान

Gramin Varta
1 Min Read

उत्तर युरोपातून कोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन; दापोलीच्या हर्णे-पाळंदे समुद्रकिनारी ‘सीगल’ पक्ष्यांचे पहिले दर्शन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

५ लाखांची खंडणी आणि मारहाण प्रकरणी पुण्यातील बिग बॉस फेम दिव्या शिंदे गजाआड; ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

2 Min Read
महाराष्ट्र

उल्हासनगर हादरले! डोक्यात दोन गोळ्या झाडून हरीश गझवानी यांची हत्या, हल्लेखोर फरार

2 Min Read
महाराष्ट्र

अकरावी प्रवेशाचा घोळ कायम; तब्बल १२ वी विशेष फेरी जाहीर, ८ लाख ८५ हजार जागा अजूनही रिक्त

2 Min Read
महाराष्ट्र

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्यासाठी मुंबईत सीजेपीचे ‘जेलभरो’ आंदोलन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?