ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा सोमवारी ३३ वा वर्धापनदिन; सहकार मेळावा, शेतकरी सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा सोमवारी ३३ वा वर्धापनदिन; सहकार मेळावा, शेतकरी सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
चिपळूण

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा सोमवारी ३३ वा वर्धापनदिन; सहकार मेळावा, शेतकरी सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 3:46 pm
Gramin Varta
67 Views
Share

चिपळूण : ‘आपली माणसं… आपली संस्था!’ या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून सहकार क्षेत्रात विश्वासार्हता, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा ३३ वा वर्धापनदिन सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध भरगच्च उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. १९ ऑक्टोबर १९९३ रोजी संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या संस्थेने सभासद, ठेवीदार आणि ग्राहकांच्या भक्कम पाठबळावर सहकार चळवळीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने सहकार मेळावा, कृषी व व्यावसायिक क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा सन्मान सोहळा आणि रंगतदार सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी १० वाजता बहादूरशेखनाका येथील पतसंस्थेच्या ‘सहकार भवन’ सभागृहात संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सहकार मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यास सहकार व पणन वस्त्रोद्योग मंत्रालयाचे माजी अपर आयुक्त एस. बी. पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे सेवानिवृत्त सहनिबंधक मिलिंद सोबले, रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट (बिळाशी) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या शेतीत नवनवे प्रयोग राबवून प्रगती साधणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा तसेच स्थानिक पातळीवर यशस्वी उद्योग-व्यवसाय उभारून रोजगाराला चालना देणाऱ्या उल्लेखनीय व्यावसायिकांचा या सोहळ्यात विशेष सन्मान केला जाणार आहे.

वर्धापनदिनाच्या निमित्ताने त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात चिपळूण नागरी परिवाराच्या वतीने दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सभासद, ग्राहक, ठेवीदार आणि हितचिंतकांना एकत्र आणणाऱ्या या सांस्कृतिक सोहळ्यामुळे वर्धापनदिनाच्या उत्सवाला अधिक रंगत येणार आहे. संस्थेच्या या दोन्ही महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना सर्व सभासद, ग्राहक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी केले आहे.

Total Visitors :

5469304
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनला उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट; कोकणात नवे मत्स्य उद्योजक घडवण्याचे आवाहन

Gramin Varta
2 Min Read

Hello world!

saurabhsalvi262@gmail.com
0 Min Read

ग्रामसभेच्या आराखड्यांतून दुष्काळमुक्तीचा ध्यास; राजापूर उपविभागाची अनोखी मोहीम

Gramin Varta
3 Min Read

रात्रीस खेळ चाले! कोकणातील डोंगररांगांमध्ये बेकायदा वृक्षतोडीचा हैदोस; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

रायफल शूटिंग स्पर्धेत जय सावंतचा अचूक वेध; सावर्डे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा, विभागस्तरावर निवड

1 Min Read
चिपळूण

चिपळूण-गुहागर मार्गावरील कोंढे जुनी शाळा थांब्यावर अपघातांची टांगती तलवार; गतीरोधक बसवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

2 Min Read
चिपळूण

सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

1 Min Read
चिपळूण

चिपळूण : निवळीतील जीर्ण पशुवैद्यकीय दवाखान्याचा होणार कायापालट

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?