दाभोळे/सिकंदर फरास: दाभोळे येथील श्री दुर्गा शक्ती मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी मंडळाच्या मंडपात आज उपस्थित राहून देवीची श्रीफळ आणि सिद्दीची भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. दाभोळे बाजारपेठेत साजरा होत असलेला हा उत्सव या मंडळाचा दुसरा वर्धापन असून, यंदाही येथे अत्यंत उत्साहात देवीची स्थापना करून विविध धार्मिक विधी व विधीवत पूजा अर्चा सुरू आहेत.
सभापती शर्वरी वेल्ये यांनी दाभोळे सह इतर ही मंडळांच्या ठिकाणी भेटी देऊन दर्शन घेतले.या विशेष प्रसंगी मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक विलास भाई बेर्डे, उप जिल्हाप्रमुख राजेश पत्याने, विभाग प्रमुख राजेश कामेरकर, राजापूर युवक संपर्क प्रमुख लक्ष्मण कदम, युवासेना तालुका प्रमुख प्रसाद अपंडकर, युवा सेना विभाग प्रमुख अंकुश सुर्वे, महिला शिवसैनिक दीपा प्रवळकर, तालुका संघटक शुभम गांधी तसेच मंडळाचे अध्यक्ष आत्माराम बावकर आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






