ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरीत भाट्ये चेक पोस्टजवळ पोलिसांच्या वाहनाला दुचाकीची धडक; मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरीत भाट्ये चेक पोस्टजवळ पोलिसांच्या वाहनाला दुचाकीची धडक; मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल
रत्नागिरी

रत्नागिरीत भाट्ये चेक पोस्टजवळ पोलिसांच्या वाहनाला दुचाकीची धडक; मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 10:36 am
Gramin Varta
223 Views
Share

रत्नागिरी : मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे आणि विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकी चालवून पोलीस मुख्यालयाच्या सरकारी वाहनाला जोरदार धडक दिल्याची घटना भाट्ये चेक पोस्टसमोरील रस्त्यावर घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण स्वतः गंभीर जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित दुचाकीस्वाराविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास मोटार परिवहन विभाग, पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथील पोलीस कॉन्स्टेबल खलील नझीर करंजे (ब.नं. ६४९) हे आपल्या ताब्यातील सरकारी बोलेरो गाडीने (क्र. एमएच ०८ एएक्स ०४३३) साक्षीदारांना घेऊन पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण कामकाज आटोपून रत्नागिरीकडे परत येत होते. त्यांचे वाहन भाट्ये पोलीस चेक पोस्टच्या पुढील रस्त्यावरून जात असताना, समोरून येणारा सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकी (क्र. एमएच ०८ बीडी १७१८) चालक मिथीलेश प्रसाद मुरकर (वय २४, रा. मागलाड, ता. जि. रत्नागिरी) हा दुचाकी चालवताना थेट मोबाईल फोनवर बोलत होता. रस्त्याची विशिष्ट परिस्थिती आणि वाहनांची वर्दळ लक्षात न घेता, त्याने अविचाराने, हलगर्जीपणाने आणि बेदरकारपणे आपली दुचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आणून थेट पोलिसांच्या बोलेरो गाडीवर आदळली.

या भीषण धडकेत दुचाकीस्वार मिथीलेश मुरकर हा रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला, तसेच या अपघातात पोलिसांचे सरकारी वाहन आणि दुचाकी या दोन्ही गाड्यांचा चक्काचूर होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले. अपघातानंतर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या संपूर्ण घटनेप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रमोद तुकाराम कांबळे (ब.नं. १२४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, शहर पोलिसांनी २७ ऑक्टोबर रोजी रात्री संशयित आरोपी मिथीलेश मुरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १८४(क) नुसार गुन्हा नोंद क्रमांक ४४०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5469255
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पुष्कर गितेची द्वितीय क्रमांक पटकावत दमदार कामगिरी

Gramin Varta
1 Min Read

सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण

Gramin Varta
2 Min Read

पोलिओने पाऊल थांबवले, जिद्दीने आयुष्याची वाटचाल सुरू ठेवली; शाकीरा कुरेशींच्या जीवनात विवाहाने उमलली नव्या पर्वाची पहाट

Gramin Varta
4 Min Read

‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’चे अर्ज ‘महाडीबीटी २.०’ प्रणालीवर सुरू; २४ योजनांचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे आवाहन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

अंधारात बुडालेल्या मजगाव, केळ्ये आणि मिरजोळे परिसरातील स्ट्रीट लाईटचा वीज पुरवठा अखेर पूर्ववत

2 Min Read
रत्नागिरी

NCMC कार्ड सक्तीमुळे राज्यभरात गोंधळ; तांत्रिक अडचणींचा फटका, मात्र रत्नागिरीत पावणेचार लाख कार्डांचे यशस्वी वितरण

2 Min Read
रत्नागिरी

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

2 Min Read
रत्नागिरी

थिबापॅलेस परिसरात मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?