ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा: आंजणारी अपघातातील तिघांच्या मृत्यू प्रकरणी मृत कंटेनर चालकावर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा: आंजणारी अपघातातील तिघांच्या मृत्यू प्रकरणी मृत कंटेनर चालकावर गुन्हा
लांजा

लांजा: आंजणारी अपघातातील तिघांच्या मृत्यू प्रकरणी मृत कंटेनर चालकावर गुन्हा

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 12:02 pm
Gramin Varta
578 Views
Share

लांजा: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आंजणारी पुलाजवळ घडलेल्या भीषण अपघातप्रकरणी कंटेनर ट्रकच्या चालकाविरुद्ध लांजा पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या शासकीय वाहनाला मागून जोरदार धडक देऊन नदीपात्रात कोसळलेल्या या भीषण अपघातात हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड यांच्यासह ट्रकचालक व क्लिनर अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.

याप्रकरणी अपघातात गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल अनिल अशोक शिंगाडे (वय ३६, रा. रत्नागिरी शहर पोलीस वसाहत) यांनी लांजा पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आंजणारी पुलाखाली नदीपात्रात गाडी कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल शिंगाडे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे शासकीय वाहनातून (क्रमांक MH 08 BE 3561) मदतकार्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक RJ 09 GE 2397) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत पोलिसांच्या उभ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही वाहने पुलावरून थेट नदीपात्रात कोसळली होती.

या भीषण दुर्घटनेत शासकीय वाहनाचा पूर्ण चक्काचूर होऊन पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड, ट्रकचालक मदन हेम सिंह (वय ४१, रा. राजस्थान) आणि क्लिनर दिनेश महेंद्र सिंह (वय १५, रा. राजस्थान) यांचा मृत्यू झाला. तर पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर लांजा पोलिसांनी मृत ट्रकचालक मदन सिंह याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक २८३/२०२६ नुसार दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संजय गांधी पेन्शन योजनेसाठी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ग्राह्य; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
2 Min Read

भोके ते जयगड नवीन रेल्वे मार्ग होणार; जयगड-सातारा जोडणीचाही विचार

Gramin Varta
3 Min Read

बीएसएनएल कंत्राटी कामगारांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदाराविरोधात मनसे आक्रमक

Gramin Varta
2 Min Read

राज्यसभेच्या 11 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा; 16 ऑक्टोबरला मतदान

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा शहरातील शेट्येवाडी येथे श्री देवी भगवती नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ

3 Min Read
लांजा

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

1 Min Read
लांजा

ब्रेकिंग: लांजा परिसरात शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेले दोघे ताब्यात; १२ बोअरची बंदूक आणि ४ जिवंत काडतुसे जप्त

2 Min Read
लांजा

मजुराला धडक देऊन पसार झालेला चालक पाचलमधून जेरबंद; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लांजा पोलीस पथकाचा सन्मान

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?