ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचा ‘लिमो’ एडिशन लॉन्च
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचा ‘लिमो’ एडिशन लॉन्च
महाराष्ट्र

टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचा ‘लिमो’ एडिशन लॉन्च

Gramin Varta
Last updated: November 9, 2026 1:06 pm
Gramin Varta
2 Views
Share

मुंबई : वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटरने भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय इनोव्हा क्रिस्टाचा ‘लिमो’ एडिशन सादर केला आहे.
वाहन भाडेतत्त्वावर चालवणारे व्यावसायिक आणि प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून हे विशेष एडिशन तयार करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ जीएक्स-एसएलएफ श्रेणीत उपलब्ध असून, त्यामध्ये २.४ लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन आणि आरामदायी कॅप्टन सीट्स देण्यात आल्या आहेत.

इनोव्हा क्रिस्टाच्या या विशेष प्रकारामध्ये इंजिन किंवा तांत्रिक रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये पूर्वीप्रमाणेच २.४ लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आराम, प्रशस्त जागा आणि उत्तम प्रवासाचा अनुभव मिळावा, हा या प्रकारामागील मुख्य उद्देश आहे. कंपनीने विशेषतः कॅप्टन सीट्स आणि वाहनाच्या आरामदायी प्रवासक्षमतेवर भर दिला आहे.

किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, इनोव्हा क्रिस्टाच्या जीएक्स फ्लीट सात आसनी प्रकाराची किंमत १९.९५ लाख रुपये, तर आठ आसनी प्रकाराची किंमत १९.९९ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या दोन्ही किंमती मुंबईसह देशभरातील शोरूममधील प्रारंभिक किंमती आहेत. विशेष म्हणजे, लिमो हा पूर्णपणे नवीन वाहनप्रकार किंवा तांत्रिक सुधारणा असलेले प्रारूप नसून, आधीपासून विक्रीस उपलब्ध असलेल्या फ्लीट प्रकाराला दिलेले नवे नाव आहे.

या वाहनामध्ये प्रशस्त केबिन, गरजेनुसार बदलता येणारी आसनव्यवस्था, सर्व आसनांच्या रांगांमध्ये वातानुकूलन यंत्रणा, डोक्याला आणि पायांना पुरेशी जागा अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय स्मार्टफोन जोडणीची सुविधा असलेली स्पर्शपडदा मनोरंजन यंत्रणा आणि स्टिअरिंगवरील नियंत्रणेही देण्यात आली आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने या वाहनात सात एअरबॅग, एबीएस, वाहन स्थिरता नियंत्रण यंत्रणा, चढावावर वाहन मागे जाण्यापासून रोखणारी यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स वितरण आणि ब्रेक असिस्ट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रमाणित माहितीनुसार, इनोव्हा क्रिस्टाची इंधन कार्यक्षमता प्रतिलिटर १५ किलोमीटरपर्यंत आहे. या वाहनात मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

या सादरीकरणाबाबत टोयोटा किर्लोस्कर मोटरचे विक्री, सेवा आणि वापरलेल्या वाहन व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष सबरी मनोहर म्हणाले की, दोन दशकांहून अधिक काळापासून इनोव्हाने विश्वास, आराम आणि दर्जेदार प्रवासाच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. व्यावसायिक प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ग्राहकांसाठीही इनोव्हा क्रिस्टा लिमोच्या माध्यमातून ही परंपरा नव्या ओळखीसह पुढे नेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Total Visitors :

5468675
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

संगमेश्वर : मुलगा व पत्नीच्या निधनाच्या मानसिक तणावातून लोवले फटकरेवाडी येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
2 Min Read

गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरीत वाहन बाजारात कोट्यवधींची उलाढाल; आठ दिवसांत ७०१ नव्या वाहनांची खरेदी

Gramin Varta
2 Min Read

कलेच्या श्रीमंतीने जीवन समृद्ध करा; फाटक हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’ कार्यक्रमात ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Gramin Varta
2 Min Read

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील माजी अग्निवीरांना राज्य सेवेत मोठा दिलासा; गट-क गणवेशधारी पदांवर १० टक्के समांतर आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय

2 Min Read
महाराष्ट्र

विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन आक्रमक; आझाद मैदानावर राज्यभरातील हजारो कामगारांचे धरणे आंदोलन

2 Min Read
महाराष्ट्र

कोयना खोऱ्यात मध्यरात्री भूकंपाचे पाच सौम्य धक्के

2 Min Read
महाराष्ट्र

ग्रामीण स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना बळ देण्यासाठी ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’बाबत महत्त्वपूर्ण करार

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?