ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे ‘केबीसी’च्या शूटिंगला ब्रेक; मालिकेच्या नवीन भागांचे चित्रीकरण थांबवले
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Wednesday, Nov 11, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे ‘केबीसी’च्या शूटिंगला ब्रेक; मालिकेच्या नवीन भागांचे चित्रीकरण थांबवले
महाराष्ट्र

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे ‘केबीसी’च्या शूटिंगला ब्रेक; मालिकेच्या नवीन भागांचे चित्रीकरण थांबवले

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 7:05 am
Gramin Varta
3 Views
Share

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त होत असतानाच लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या (कबीसी) चित्रीकरणाला तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे.

बई, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त होत असतानाच लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या (कबीसी) चित्रीकरणाला तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे.

अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे निर्मात्यांनी गेल्या आठवड्यापासून नवीन भागांचं शूटिंग थांबवल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

चित्रीकरण थांबल्याने चॅनेलने दिवाळी विशेष कार्यक्रमांतर्गत यापूर्वी शूट केलेले सेलिब्रिटी स्पेशल भाग प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. ‘रामायण’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे यांनी अलीकडेच या शोमध्ये हजेरी लावली होती. या विशेष भागाचं प्रसारण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आसपास करण्याचं नियोजन होतं. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे प्रसारणाचं वेळापत्रक बदलण्यात आलं. दिवाळी विशेष आठवड्याची सुरुवात ‘रामायण’च्या टीमच्या भागाने करण्यात आली.अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास पुढील आठवड्यापासून ‘केबीसी’चे शूटिंग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांची तब्येत साथ देत असेल तरच चित्रीकरणाला सुरुवात केली जाईल, असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी शनिवारी आपल्या ब्लॉगमधून कामावर आणि नियमित दिनचर्येकडे हळूहळू परतत असल्याचे संकेत दिले आहेत. ‘नियमित दिनचर्येकडे आणि कामाच्या नियंत्रित आयुष्याकडे हळूहळू परतण्याचा प्रवास सुरू आहे. रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली असते; मात्र काही काळ त्यापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टी वेगळ्या वाटू लागतात,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.तसेच चष्मा आणि मोबाईल कुठे ठेवला किंवा पुढे काय करायचं होतं, यांसारख्या छोट्या गोष्टी कधीकधी विसरायला होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. त्यांच्या या ब्लॉगमुळे ते पुन्हा कामाच्या विश्वात परतण्याच्या तयारीत असल्याचं दिसत असलं, तरी त्यांच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि चिंता कायम आहे.

Total Visitors :

5470215
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण संपन्न

Gramin Varta
9 Min Read

राज्यातील पहिले ग्रीन डेटा सेंटर उजनी जलाशयावर

Gramin Varta
5 Min Read

मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

Gramin Varta
2 Min Read

मतदार यादीतील घोळाविरोधात आज राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयावर धडकणार

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

शिवाजी पार्कवरील सीजेपीच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; अभिजीत दीपके यांचा २ ऑक्टोबरला थेट ‘जेल भरो’चा इशारा

2 Min Read
महाराष्ट्र

आज १ ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे मोठे बदल; जाणून घ्या नवे नियम लागू

3 Min Read
महाराष्ट्र

टाटा मोटर्सने टाटा सिएरा ‘डार्क एडिशन’ केले लाँच

2 Min Read
महाराष्ट्र

दिवाळीच्या खरेदीची स्वप्ने अधुरीच! घराबाहेर पडलेले तीन तरुण मृत्यूच्या जबड्यात; ऊसाच्या ट्रकखाली दुचाकीचा चक्काचूर

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?