ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सोमेश्वरात ‘हिरकणी’चा थरारक जिवंत देखावा; मातृत्वाच्या जिद्दीची आणि धैर्याची प्रेरणादायी गाथा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सोमेश्वरात ‘हिरकणी’चा थरारक जिवंत देखावा; मातृत्वाच्या जिद्दीची आणि धैर्याची प्रेरणादायी गाथा
रत्नागिरी

सोमेश्वरात ‘हिरकणी’चा थरारक जिवंत देखावा; मातृत्वाच्या जिद्दीची आणि धैर्याची प्रेरणादायी गाथा

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 1:18 pm
Gramin Varta
41 Views
Share

रत्नागिरी : कोकणातील गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता कला, संस्कृती आणि प्रबोधनाची परंपरा जपणारा उत्सव म्हणून ओळखला जातो. गणेशोत्सवात ऐतिहासिक, पौराणिक तसेच सामाजिक विषयांवर आधारित हलते देखावे अर्थात चलचित्र साकारण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात उत्साहाने जोपासली जात आहे. याच परंपरेचा वारसा पुढे नेत रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील श्री. मयुर भितळे यांच्या घरी यंदा माता हिरकणीच्या अदम्य मातृत्वाचा आणि धैर्याचा जिवंत चलचित्र देखावा साकारण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणीचा ऐतिहासिक प्रसंग या देखाव्यात अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आला आहे. सायंकाळनंतर रायगडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर गडाखाली असलेल्या आपल्या तान्हुल्या बाळाच्या ओढीने व्याकुळ झालेली हिरकणी रात्रीच्या अंधारात रायगडाच्या अवघड कड्यावरून खाली उतरते. कोणतेही आधुनिक साधन अथवा मदत नसताना केवळ आपल्या बाळासाठी मातृत्वाच्या बळावर तिने अशक्यप्राय वाटणारे धाडस केले. हा थरारक प्रसंग चलचित्राच्या माध्यमातून हुबेहूब उभा करण्यात आला आहे.

देखाव्याची कलात्मक मांडणी, प्रकाशयोजना आणि तांत्रिक कौशल्यामुळे हिरकणीचा कड्यावरून उतरण्याचा प्रसंग अक्षरशः डोळ्यांसमोर घडत असल्याचा अनुभव भाविकांना येत आहे. हा देखावा पाहण्यासाठी सोमेश्वरसह परिसरातील गावांमधील नागरिक आणि गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

हिरकणीच्या धैर्याची ही कहाणी केवळ इतिहासाची आठवण करून देणारी नसून, त्यातून जिद्द, संघर्ष आणि परिस्थितीवर मात करण्याचा संदेशही देण्यात आला आहे. आयुष्यात कितीही कठीण आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तरी मनात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर माणूस अशक्य वाटणाऱ्या अडचणींवरही मात करू शकतो, हा विचार या देखाव्यातून मांडण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्री गणरायाच्या चरणी सुख-समृद्धीची प्रार्थना करताना संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती, अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची जिद्द आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा मिळावी, असा प्रबोधनात्मक संदेश या चलचित्रातून देण्यात आला आहे.

Total Visitors :

5427552
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवात बाजारपेठेत १०० कोटींहून अधिक रकमेची आर्थिक उलाढाल

Gramin Varta
2 Min Read

गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का; संगमेश्वरातील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

पाणीपट्टीवरून मुरादपूरच्या सरपंचांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; मंडणगड पोलिसांत गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

मिरकरवाडा बंदरातील मोडकळीस आलेल्या विनावापर नौका हटवण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

‘देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’; प्रादेशिक मनोरुग्णालयात भक्तीचा रंग

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत मध्यरात्री भरधाव मोटारीचा थरार; थिबा पॅलेस मार्गावर वाहनासह बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडक

2 Min Read
रत्नागिरी

कळझोंडी उपकेंद्रात सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; ६२ ग्रामस्थांनी घेतला लाभ

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ७० वर्षीय महिला घरातून बेपत्ता; पोलिसांत तक्रार दाखल

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?