रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख व अधिकारी महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी दीपक नागवेकर यांची, तर सचिवपदी विशाल घोलप यांची निवड करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत राज्य अध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली.
जिल्हा कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी असे – जिल्हा मार्गदर्शक दत्तात्रय वाघमारे (खेड), कार्याध्यक्ष उजेर शेख (दापोली), कार्याध्यक्ष संदीप कंदुरकर (खेड), कोषाध्यक्ष बालाजी बोंबळे (चिपळूण), महिला आघाडी अध्यक्ष – वृषाली हेळेकर (राजापूर), महिला आघाडी उपाध्यक्ष – पल्लवी पवार (गुहागर), कायदेविषयक सल्लागार – प्रमोद गुंजाळ (दापोली), जिल्हा उपाध्यक्ष सूरज जाधव (राजापूर), चंद्रकांत कोरबू (खेड), सहसचिव- अमोल कोंडुस्कर (राजापूर), सहकोषाध्यक्ष अशोक तांदळे (मंडणगड), जिल्हा संघटक रवींद्र जाधव (लांजा).
यावेळी राज्य निरीक्षक म्हणून गणेश राऊत (जळगाव), विक्रम वागरे (कोल्हापूर) उपस्थित होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि केंद्रप्रमुख, अधिकारी यांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण काम करत राहू, अशी ग्वाही नूतन जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर आणि त्यांच्या कार्यकारिणीने दिली.






