ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दंतवैद्यकीय क्षेत्रात मिरजोळीच्या असीला दलवाईचे उज्ज्वल यश; गाझियाबाद येथून ‘एमडीएस’ पदव्युत्तर पदवी संपादन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दंतवैद्यकीय क्षेत्रात मिरजोळीच्या असीला दलवाईचे उज्ज्वल यश; गाझियाबाद येथून ‘एमडीएस’ पदव्युत्तर पदवी संपादन
चिपळूण

दंतवैद्यकीय क्षेत्रात मिरजोळीच्या असीला दलवाईचे उज्ज्वल यश; गाझियाबाद येथून ‘एमडीएस’ पदव्युत्तर पदवी संपादन

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 8:26 am
Gramin Varta
15 Views
Share

चिपळूण: तालुक्यातील मिरजोळी गावच्या कन्या डॉ. असीला हसन अली खान दलवाई यांनी Master of Dental Surgery (MDS) मधील Prosthodontics या शाखेत पदव्युत्तर पदवी यशस्वीरीत्या संपादन करत दंतवैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत चुरशीची समजली जाणारी NEET-PG परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी दिल्लीजवळील संतोष मेडिकल युनिव्हर्सिटी, गाझियाबाद येथून ही उच्च पदवी प्राप्त केली. त्यांच्या या यशाने चिपळूण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, गावासह परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

असीला यांच्या शालेय शिक्षणाची सुरुवात मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमधून झाली होती. त्यांचे वडील नोकरीच्या निमित्ताने मस्कत येथे वास्तव्यास असल्याने पुढील शिक्षण त्यांनी मस्कत येथे पूर्ण केले. लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या असीला यांनी नेरूळ येथील प्रसिद्ध तेरणा मेडिकल कॉलेजमधून दंतचिकित्सेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाचा ध्यास घेत अखंड मेहनत, जिद्द आणि अभ्यासपूर्ण सातत्याच्या जोरावर त्यांनी गाझियाबादमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला.

मिरजोळी गावातील जुन्या पिढीतील अत्यंत आदरणीय व शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले गुरुजी कै. अली मास्तर यांची असीला या नात असून, गोवळकोट येथील जुन्या पिढीतील ओलिमिया मुकादम यांच्याही त्या नात आहेत. दंतचिकित्सा क्षेत्रात मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार तसेच मिरजोळी व चिपळूण परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5428549
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा

Gramin Varta
2 Min Read

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी २.० पोर्टल तातडीने सुरू करा

Gramin Varta
2 Min Read

मालगुंड ग्रामपंचायतीत जयगड पोलिसांचा सायबर जनजागृती उपक्रम; ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत नागरिकांशी थेट संवाद

Gramin Varta
2 Min Read

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली तीव्र; आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

सावर्डे-नायशी फाट्यावर एसटी बसची कारला धडक; मुलगी किरकोळ जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read
चिपळूण

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

2 Min Read
चिपळूण

खेर्डीत तालुकास्तरीय शालेय व खुली बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

2 Min Read
चिपळूण

चिवेलीतील ३३ लाखांच्या पेयजल योजना घोटाळ्यात कारवाईला टाळाटाळ; संतप्त ग्रामस्थांची पाणी पुरवठा विभागावर धडक, १० दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?