ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत निवळीचा पंकज शिंदे ‘बीएएमएस डॉक्टर’
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत निवळीचा पंकज शिंदे ‘बीएएमएस डॉक्टर’
चिपळूण

चिपळूण : हलाखीच्या परिस्थितीवर मात करत निवळीचा पंकज शिंदे ‘बीएएमएस डॉक्टर’

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 8:32 am
Gramin Varta
191 Views
Share

संगमेश्वर (दिनेश अब्रे) : परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याने राज्याला अनेक आरोग्य रत्ने दिली आहेत. याच परंपरेत आता निवळी (कोंडवाडी) येथील एका सामान्य कुटुंबातील तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. स्थानिक शाळेत प्रामाणिकपणे शिपाई पदावर कार्यरत असलेले आदर्श नागरिक रमेश भाई भालचंद्र शिंदे आणि त्यांची पत्नी सुलभा शिंदे यांच्या कष्टाचे चीज झाले असून, त्यांचा सुपुत्र पंकज रमेश शिंदे याने ‘बीएएमएस’ (BAMS) ही पदवी संपादन करून डॉक्टर होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात आणले आहे. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असतानाही पती-पत्नीने अपार मेहनत घेत पंकजच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले, तर पंकजनेही लहानपणापासूनच कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर या विश्वासाला सार्थ ठरवले.

शालेय जीवनापासूनच अत्यंत हुशार असलेल्या पंकजने निवळी हायस्कूलमधून इयत्ता दहावीत घरीच अभ्यास करून तब्बल ९६ टक्के गुणांसह प्रथम श्रेणी पटकावली होती. पुढे वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करण्याची मनीषा बाळगून त्याने कालिदास कॉलेजमधून आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. या खडतर शैक्षणिक प्रवासात आजोबा भालचंद्र शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन, बहीण सानिका हिची साथ आणि नातेवाईकांचे मोठे प्रोत्साहन लाभले. या यशात भाई शिंदे (बुवा), हवालदार विजय राठोड आणि नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभल्याचे डॉ. पंकज शिंदे यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. वैद्यकीय पदवी प्राप्त झाल्यानंतर मित्रमंडळींनी एकत्र येत त्याचा छोटेखानी सत्कार करत आनंद साजरा केला.

दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये रात्री-अपरात्री आरोग्य आणीबाणीच्या काळात हक्काच्या डॉक्टरांची भासणारी उणीव लक्षात घेता, डॉ. पंकज यांच्या रूपाने आता निवळी-कोंडवाडी परिसराला एक हक्काचा डॉक्टर लाभला आहे. आपल्या मुलाने घेतलेली ही गगनभरारी पाहून वडील रमेश भाई शिंदे यांच्यासह आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले असून, त्यांचे जीवन सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रेरणादायी यशाबद्दल निवळी पंचक्रोशीत अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले असून डॉ. पंकज शिंदे यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5468456
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

इंडी आघाडीच्या बैठकीत एसआयआर, ईव्हीएम आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यावर सहमती

Gramin Varta
6 Min Read

जागतिक अन्न दिनानिमित्त शिरगावच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये पाककला स्पर्धा संपन्न

Gramin Varta
3 Min Read

ब्रेकिंग: लांजा, खेड आणि मंडणगडसह राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये अखेर दुष्काळ जाहीर; राज्य शासनाचा मोठा निर्णय

Gramin Varta
2 Min Read

World Independently and Embracing the Freedom of Solo Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

चिपळूण

कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम! चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांचा ठाकरे गटातर्फे सन्मान

2 Min Read
चिपळूण

चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू

1 Min Read
चिपळूण

रत्नागिरीतील वंचित सहा तालुक्यांचा तातडीने दुष्काळात समावेश करा; आमदार भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

2 Min Read
चिपळूण

पालवणच्या पाणी कमिटी अध्यक्षपदी भरत सावर्डेकर यांची बिनविरोध निवड; पहिल्याच सभेत पारदर्शक कारभाराचा ऐतिहासिक निर्णय

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?