ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: फिनोलेक्स कॉलनीतील बंद फ्लॅट्सचे कडी-कोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » फिनोलेक्स कॉलनीतील बंद फ्लॅट्सचे कडी-कोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न
रत्नागिरी

फिनोलेक्स कॉलनीतील बंद फ्लॅट्सचे कडी-कोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 11:21 am
Gramin Varta
84 Views
Share

रत्नागिरी (प्रतिनिधी): तालुक्यातील पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फिनोलेक्स कॉलनी फेज-०३ मधील आकाश इमारतीतील बंद फ्लॅट्सचे कडी-कोयंडे तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिमल मुरारीसहाय वर्मा (वय ४९, मूळ रा. वास्को, गोवा, सध्या रा. रूम नं. डी-१०, फिनोलेक्स कॉलनी, झाडगाव, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिनोलेक्स कॉलनी फेज-०३ मधील आकाश इमारतीच्या तळमजल्यावरील रूम क्रमांक ७४ आणि रूम क्रमांक ७५ हे दोन्ही फ्लॅट्स बंद होते. शनिवार, १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा ते रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने या बंद घरांना लक्ष्य केले. चोरट्याने चोरीच्या उद्देशाने धारदार अथवा लोखंडी हत्याराने दोन्ही रूमचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला आणि घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात घरातून कोणताही ऐवज चोरीला गेलेला नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिमल वर्मा यांच्या फिर्यादीवरून पूर्णगड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ आणि ६२ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ८२/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वसाहतीत अशा प्रकारे घरफोडीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468468
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गोवळ-विल्ये दरम्यान अर्जुना नदीवरील मोठ्या पुलासाठी २५ कोटींचा निधी मंजूर; खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीच्या आठवडा बाजारात अज्ञाताने काचा फोडून चारचाकी पेटवली

Gramin Varta
1 Min Read

ब्रेकिंग:रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क

Gramin Varta
1 Min Read

चिपळूण पोलिसांची ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई; खेर्डीतून सव्वासात लाखांच्या मेफेड्रोनसह संशयित गजाआड

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

बालक व किशोरांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम प्रभावीपणे राबवा; रत्नागिरीत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत मारुती मंदिर परिसरामध्ये भीषण अपघात; रस्ता ओलांडताना वृद्धाला दुचाकीची धडक, प्रकृती गंभीर

1 Min Read
रत्नागिरी

उदय जाधव लिखित ‘गार्गी आणि इतर एकांकिका’ला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार

1 Min Read
रत्नागिरी

‘स्कील इज फ्युचर’; तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी कौशल्ये सातत्याने अपग्रेड करावीत: जिल्हाधिकारी मनुज जिंदल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?