ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत तालुक्यात भरारी: प्रभागस्तरीय शिक्षण परिषदेत पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं. १ शाळांचे कौतुक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत तालुक्यात भरारी: प्रभागस्तरीय शिक्षण परिषदेत पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं. १ शाळांचे कौतुक
राजापूर

पाचल बीटची शैक्षणिक गुणवत्तेत तालुक्यात भरारी: प्रभागस्तरीय शिक्षण परिषदेत पाचल बौद्धवाडी व रायपाटण नं. १ शाळांचे कौतुक

Gramin Varta
Last updated: October 14, 2026 7:34 pm
Gramin Varta
79 Views
Share

पाचल (तुषार पाचलकर): राजापूर तालुक्यातील पाचल बौद्धवाडी आणि रायपाटण नं. १ या शाळांची शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत कौतुकास्पद असून, पाचल बीटने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात राजापूर तालुक्यात मोठी आघाडी घेतली आहे, असे गौरवोद्गार राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी काढले. पाचल येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रभागस्तरीय शिक्षण परिषदेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. राजापूर तालुका शिष्यवृत्ती अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे नमूद करत तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांची असून ती नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवण्यासाठी नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि वैयक्तिक लक्ष देण्यावर भर देत शिक्षकांनी अध्यापन कौशल्यात सातत्याने सुधारणा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांनी प्रामाणिक प्रयत्नांतून गुणवत्ता सिद्ध करावी आणि पाचल बीटमधील शाळांनी मिळविलेली ही आघाडी कायम ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या परिषदेत धुळे सर यांनी ‘मूल्यवर्धन उजळणी’ विषयावर मार्गदर्शन करून अध्ययन प्रक्रिया परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या नियोजनाचे महत्त्व समजावून सांगितले, तर श्री. बिर्जे यांनी ‘स्पर्श’ विषयावर मार्गदर्शन करत शैक्षणिक बाबींचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच परितकर मॅडम यांनी उत्कृष्ट नियोजन व प्रभावी मांडणीच्या जोरावर सादर केलेल्या आदर्श पाठाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. शिष्यवृत्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी, मूल्यवर्धन उजळणी आणि नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींवर सखोल चर्चा घडवून आणत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीचा संकल्प करणारी ही प्रभागस्तरीय शिक्षण परिषद अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Total Visitors :

5469303
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूणात संशयास्पदरीत्या मोटारसायकल चालविणारा तरुण ताब्यात; ५० हजारांची दुचाकी जप्त

Gramin Varta
1 Min Read

जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमसाठी ‘चलो दिल्ली’; १ नोव्हेंबरला देशव्यापी आंदोलन

Gramin Varta
4 Min Read

दापोलीच्या लढवय्या आशासेविकेच्या अकाली निधनाने डोळे पाणावले!

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान मराठी साहित्य संमेलन- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

राजापूर

वस्त्रहरणकार कै. गंगाराम गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मालवणात ‘अशा या दोघी’ नाटकाचा विशेष प्रयोग; ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांची प्रमुख उपस्थिती

2 Min Read
राजापूर

राजापूर: जामदा धरण पुनर्वसनात १ हजार बोगस घरांचा संशय; SIT चौकशीची मनसेची मागणी

2 Min Read
राजापूर

राजापूर बाजारपेठ रस्त्यावर बेकायदा मासळी विक्री आणि अस्वच्छता; नाटे येथील ६ महिला विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

1 Min Read
राजापूर

राजापूर तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूविक्रीविरोधात भाजप आक्रमक; उत्पादन शुल्क अधिकाऱ्याच्या कथित गैरवर्तनामुळे लांजात ठिय्या आंदोलन

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?