ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत मनसेची स्वाक्षरी मोहीम
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत मनसेची स्वाक्षरी मोहीम
रत्नागिरी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी रत्नागिरीत मनसेची स्वाक्षरी मोहीम

Gramin Varta
Last updated: October 18, 2026 6:07 pm
Gramin Varta
98 Views
Share

रत्नागिरी: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रत्नागिरीतील मारुती मंदिर सर्कल येथे जोरदार स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेला रत्नागिरीकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आपल्या स्वाक्षऱ्या नोंदवल्या.

सध्याच्या निवडणूक प्रणालीबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालेल्या संशयास्पद वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली. संपूर्ण SIR प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी, आगामी सर्व निवडणुका या पारंपारिक बॅलेट पेपरवर (मतपत्रिकेवर) घेण्यात याव्यात आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून लावून धरण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा सूर या वेळी व्यक्त करण्यात आला.

मनसेचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली. या प्रसंगी रत्नागिरी शहर तसेच तालुक्यातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. निवडणूक पद्धतीत सुधारणा आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेत नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा करून जनमताचा कौल स्पष्टपणे मांडला आहे.

Total Visitors :

5468524
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय अखेर कार्यान्वित; दापोली, खेड आणि मंडणगडवासीयांची पायपीट थांबणार!

Gramin Varta
2 Min Read

स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी पालिकेचा राज्यात चौथा क्रमांक

Gramin Varta
1 Min Read

दाभोळेत भक्तिमय वातावरणात गणरायाला भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनिसांच्या वाढीव मानधनासाठी ७४ कोटींचा निधी वितरित

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

मेर्वी गुरववाडी प्राथमिक शाळा इमारतीच्या प्रतीक्षेत;गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निधी देण्याची मागणी

1 Min Read
रत्नागिरी

करबुडे येथील २७ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या समस्या सोडवा; रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे शिक्षणमंत्र्यांना साकडे

2 Min Read
रत्नागिरी

ब्रेकिंग: रत्नागिरीत सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?