ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पानवलचे पाणी शहरात आणण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पानवलचे पाणी शहरात आणण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार
रत्नागिरी

पानवलचे पाणी शहरात आणण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार

Gramin Varta
Last updated: October 22, 2026 10:19 am
Gramin Varta
103 Views
Share

७५ लाखांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने रत्नागिरीचा पाणीप्रश्न सुटणार

रत्नागिरी: रत्नागिरी शहरावर ओढवणारे संभाव्य पाणीसंकट वेळेत रोखण्यासाठी आणि नागरिकांना सुरळीत, मुबलक पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष पुढाकार घेत प्रशासकीय पातळीवर धडक पावले उचलली आहेत. रत्नागिरी नगर परिषद पाणीपुरवठा समितीचे सभापती निमेश नायर यांच्याकडून शहरात तातडीने करावयाच्या आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यवाही वेगाने सुरू केली असून, त्यामुळे रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यापूर्वी शहरात नळपाणी योजनेचे काम करणाऱ्या अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीचे शीळ धरणाच्या ठिकाणचे थकीत देयक प्रलंबित राहिले होते. हे बिल अदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सर्वसाधारण सभेत ठराव संमत झाल्यानंतर सुमारे ७५ लाख रुपयांच्या थकीत बिलाला अखेर प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. कंत्राटदार कंपनीला हा निधी उपलब्ध झाल्याने गेल्या काही काळापासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना आता प्रत्यक्ष वेग प्राप्त होणार आहे.

या निधीच्या माध्यमातून पानवल धरणाकडून नाचणे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १ हजार ३०० मीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या कामाला गती मिळणार आहे. यासोबतच नाचणे तलावात साचलेला गाळ पूर्णपणे उपसून काढणे आणि हे पाणी शुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी आवश्यक ती नवी जलवाहिनी टाकण्याचे कामही हाती घेतले जाईल. शीळ धरणावरील जुनी जॅकवेल पडून विहीर बुजल्याने ती विहीर पूर्णपणे उपसून साफ करणे आणि नव्याने बांधून घेणे अत्यावश्यक असल्याचे सभापतींनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या सर्व तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण कामांसाठी आवश्यक असणारा संपूर्ण निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले आहे. पानवल धरणाचे पाणी प्रत्यक्ष शहरात पोहोचल्यानंतर आणि शीळ धरणावरील जॅकवेल विहीर पूर्णपणे पूर्ववत कार्यान्वित झाल्यानंतर रत्नागिरी शहराचा जटील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकालात निघेल, असा ठाम विश्वास आता प्रशासन आणि सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

Total Visitors :

5469367
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूणमध्ये गॅस सिलेंडरच्या वादातून परप्रांतीय तरुणाला मारहाण; लोखंडी रॉडने डोक्यात व खांद्यावर वार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी पडवण-लांजा एसटी बसफेरी सुरू

Gramin Varta
2 Min Read

कोकण रेल्वेची सातासमुद्रापार भरारी; काँगोमध्ये मेट्रो तर श्रीलंकेत उभारणार पूल, जागतिक पातळीवर रचणार नवा इतिहास

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी एमआयडीसीच्या पाच धरणांमध्ये मुबलक साठा; उद्योग अन् लगतच्या गावांची उन्हाळ्यातील पाण्याची चिंता मिटली

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ

2 Min Read
रत्नागिरी

अभिजात भाषा आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी मालगुंडमध्ये ‘कोमसाप’ची विशेष सभा संपन्न

2 Min Read
रत्नागिरी

महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे शीतगृहाची रत्नागिरीत होणार उभारणी

2 Min Read
रत्नागिरी

मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी; तन्वी सावंत देसाईला अभिनयाचे सुवर्णपदक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?