ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: दापोली विंटर सायक्लोथॉनच्या दहाव्या पर्वाने १५ नोव्हेंबरला अवघी दापोली होणार सायकलमय
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » दापोली विंटर सायक्लोथॉनच्या दहाव्या पर्वाने १५ नोव्हेंबरला अवघी दापोली होणार सायकलमय
दापोली

दापोली विंटर सायक्लोथॉनच्या दहाव्या पर्वाने १५ नोव्हेंबरला अवघी दापोली होणार सायकलमय

Gramin Varta
Last updated: October 28, 2026 3:50 pm
Gramin Varta
30 Views
Share

दापोली : शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी सायकल संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि नागरिकांमध्ये सायकल चालवण्याची आवड वाढीस लागावी या व्यापक हेतूने दापोली सायकलिंग क्लबच्या वतीने रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ५:३० वाजता सोहनी विद्यामंदिर मैदानात बहुचर्चित ‘दापोली विंटर सायक्लोथॉन २०२६’च्या दहाव्या सिझनचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मानाच्या सायक्लोथॉनचे यंदाचे हे दशकपूर्ती वर्ष असून राज्य, देश तसेच विदेशातील अनेक नावाजलेले सायकलपटू आपल्या कुटुंबीयांसमवेत दापोलीत दाखल होणार असल्याने अवघी दापोली नगरी सायकलमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे. स्पर्धकांसाठी ३० किलोमीटर आणि ५० किलोमीटर अशा दोन टप्प्यांत ही स्पर्धा होणार असून, अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सायकलस्वारास आकर्षक पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यातील ५० किमी अंतराचा कोस्टल सिनिक रुट सोहनी विद्यामंदिर दापोली येथून सुरू होऊन करजगाव, परशुराम भूमी बुरोंडी, तामसतीर्थ, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, हर्णै आणि आसूद असा निसर्गरम्य सागरी किनारपट्टीवरून मार्गक्रमण करत पुन्हा दापोली येथे समाप्त होईल; तर ३० किमी मार्गावर धावणारी सायकल सोहनी विद्यामंदिर दापोली ते लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, आसूद आणि दापोली अशा मार्गाने पूर्ण होईल. या संपूर्ण राईड मार्गावर स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी स्वयंसेवक, पिण्याचे पाणी, फळे, अल्पोपहार, बॅकअप टेम्पो आणि तत्काळ वैद्यकीय मदतीची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या नऊ पर्वांप्रमाणेच याही वर्षी देश-विदेशात सायकलिंग केलेल्या अनुभवी रायडर्सशी संवाद साधणे आणि त्यांचे प्रेरणादायी अनुभव ऐकणे स्थानिक क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने दाखल होणारे पर्यटक व स्पर्धक दापोलीतील पर्यटन स्थळांना भेटी देत स्थानिक उत्पादनांची खरेदी व अस्सल कोकणी खाद्यसंस्कृतीसह मासळीच्या जेवणाचा आस्वाद घेत असल्याने स्थानिक पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/W6VhbXD7YTa7w39Z6 या लिंकवर ५ नोव्हेंबरपर्यंत आगाऊ ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य असून, नोंदणीकृत स्पर्धकांना १४ नोव्हेंबरच्या सायंकाळी चेस्ट बिब नंबरचे वाटप केले जाईल. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७ अथवा ९०२८७४१५९५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नागरिकांनी आत्तापासूनच सरावाला सुरुवात करून आपल्या संपूर्ण कुटुंबासह या महोत्सवात सहभागी व्हावे आणि सायकल चालवून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे, असे जाहीर आवाहन दापोली सायकलिंग क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

नवऱ्याने कॅप्सूलमधून खाऊ घातले ब्लेडचे तुकडे; न्यायालयात साक्ष फिरवली तरी नवरा ठरला दोषी

Gramin Varta
3 Min Read

कोकणात तीन दशके अविरत आरोग्यसेवा देणाऱ्या चिपळूणच्या डॉ. यतीन व डॉ. वैशाली जाधव दाम्पत्याला ‘आरोग्यरत्न’ पुरस्कार जाहीर

Gramin Varta
2 Min Read

दापोली : शेवग्याच्या फांद्या तोडताना कंपाऊंडवरून पडून वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

आंजणारी दुर्घटनेतील ‘त्या’ खोट्या कॉलचे गूढ कायम; तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

दापोली तालुक्यात युद्धपातळीवर पीक पाहणी; तहसीलदार अर्चना बोंबे यांनी केली आसूदमध्ये भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी

1 Min Read
दापोली

भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पावरून दापोलीत राजकीय वातावरण तापले; ठाकरे शिवसेनेचा कडाडून विरोध

2 Min Read
दापोली

कोकणच्या सुपुत्राची हिमालयात सायकल स्वारी; दापोलीच्या अभिजित मयेकर यांची ४०० किमीची सोलो मोहीम यशस्वी

2 Min Read
दापोली

दापोलीत घरकाम करणाऱ्या महिलेकडून  सोन्या-चांदीचे दागिने लंपास

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?