लांजा /अरबाज नेवरेकर : तालुक्यातील युवा पत्रकार आणि लेखक प्रविण कांबळे यांनी लिहिलेल्या ‘नाडा ‘ एकांकिकेने दि.२५ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला असून कलारंग थिएटर्स लांजा यांनी सादर केलेल्या नाडा या एकांकिकेची नवी मुंबई येथे राज्यस्तरीय स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. खेरवसे गावचे सुपूत्र पत्रकार प्रविण कांबळे हे सद्या दै. पुढारी चे लांजा तालुक्यात पत्रकार म्हणून कार्यरत असून साहित्य क्षेत्राशी त्यांची नाळ जुळली आहे. कथा, कविता, नाटक, एकांकिका या प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. गेली १८ वर्षे पत्रकारिते कार्यरत असताना लेखन आणि अभिनयाची जाण असणारे प्रविण कांबळे यांनी अंधारवाटा या दोन अंकी नाटकाचे लेखन केले आहे. यासह सद्या रसिकांची उत्तम प्रतिसाद मिळत असलेली त्यांची नाडा एकांकिका समाज प्रबोधनाचे काम करत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला व मुंबई चेंबूर, रत्नागिरी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत रसिक प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. दि.२५ऑक्टोबर रोजी नवी मुंबई कोपरखैरणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे.राज्य भरातून २१ एकांकिका मधून नाडा या एकांकिकेने यश प्राप्त केले आहे. नाडा या एकांकिकेचे सादरीकरण लांजा येथील कलारंग थिएटर्स लांजा या संस्थेने केले.
उत्तम अभिनय, पार्श्वसंगीत, कलाकरांनी केले दर्जेदार सादरण यामुळे नाडा एकांकिकेची महाअंतिम फेरीत निवड झाली आहे. ही महाअंतिम फेरी मंगळवार दि.३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. नाडा एकांकिकेत स्वतः लेखक, दिग्दर्शक आणि अभिनय प्रविण कांबळे करत असून मिथुन हसोळकर, भारत पालवकर, चेतन जाधव, सायली भोरे, सलोनी जाधव, विलास कोटकर, संदीप धनावडे, सुरज वाडेकर, बाल कलाकार म्हणून अर्णव जाधव, समृद्धी पालवकर हे अभिनय करत आहेत. तर पार्श्वसंगीत प्रदिप कांबळे, प्रकाश योजना दयानंद चव्हाण यांचे आहे. सद्या कलारंग थिएटर्स लांजा यांनी बाळा जो जो रे व अंधारवाटा अशा दोन नाटकांची निर्मिती केली आहे. नाडा एकांकिका प्रेक्षकांना आकर्षित करते आहे.






