ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कनकाडीतील ‘जल जीवन’ योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात संगमेश्वर पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कनकाडीतील ‘जल जीवन’ योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात संगमेश्वर पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू
संगमेश्वर

कनकाडीतील ‘जल जीवन’ योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात संगमेश्वर पंचायत समितीसमोर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू

Gramin Varta
Last updated: September 17, 2026 3:28 pm
Gramin Varta
30 Views
Share

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील मौजे कनकाडी ग्रामपंचायत हद्दीतील ‘जल जीवन मिशन’ योजनेत झालेल्या कथित अपहार, अनियमितता आणि कागदोपत्री बिले मंजूर करण्याच्या गैरव्यवहाराविरोधात आज, १७ सप्टेंबर रोजी संगमेश्वर पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांनी आमरण बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तक्रारदार विकास बारकू गुरव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि चालढकल होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

कनकाडी येथील जल जीवन मिशन योजनेतील कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, ग्रामपंचायत स्तरावर विशेष सभा आयोजित करावी आणि या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून १५ दिवसांत लेखी अहवाल द्यावा, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने लावून धरण्यात आली होती. संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवरूख कार्यालयाने पाहणी व सभेचे आश्वासन पत्राद्वारे दिले होते; मात्र निश्चित तारीख न ठरवता प्रत्यक्ष कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमधील असंतोष शिगेला पोहोचला. प्रशासनाच्या या दिरंगाई आणि आश्वासनांच्या भंगाविरोधात पूर्वसूचना दिल्याप्रमाणे आजपासून पंचायत समिती कार्यालयासमोर हे तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनात विकास गुरव यांच्यासह प्रशांत गुरव, संदीप गोताड, प्रकाश नेवरेकर, मनोहर गुरव, शांताराम गुरव, गणपत गोताड, प्रकाश गुरव, प्रविण गुरव, राजाराम गोताड, संतोष डांगल, शिवाजी गराटे, करण गराटे, रोहित चाचे, प्रविण गराटे, धोंडीराम गुरव, संदेश घडशी, महेश गुरव यांच्यासह कनकाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि कामांची निष्पक्ष चौकशी सुरू केली जात नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला असून, आता यावर पंचायत समिती व संबंधित प्रशासन काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :

5427569
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

देवरुख : रानगव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या स्वप्नील पेडामकरच्या कुटुंबाला वनविभागाची १० लाखांची मदत

Gramin Varta
2 Min Read

कोयना खोऱ्यात मध्यरात्री भूकंपाचे पाच सौम्य धक्के

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत चोरीचे चांदीचे ताट विकण्याचा डाव फसला; सोनाराच्या सतर्कतेने महिला जेरबंद

Gramin Varta
1 Min Read

अपुऱ्या पावसामुळे गंभीर परिस्थिती : शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात

1 Min Read

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

1 Min Read
संगमेश्वर

१५२ वर्षांची अखंड परंपरा! २५ घरांचा एकच बाप्पा

3 Min Read
संगमेश्वर

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?