ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मोठ्या पडद्यावर चमकला लांजाचा सुपुत्र; ‘जयंती २’ चित्रपटात आर्यन कासारेचा प्रभावी अभिनय
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मोठ्या पडद्यावर चमकला लांजाचा सुपुत्र; ‘जयंती २’ चित्रपटात आर्यन कासारेचा प्रभावी अभिनय
लांजा

मोठ्या पडद्यावर चमकला लांजाचा सुपुत्र; ‘जयंती २’ चित्रपटात आर्यन कासारेचा प्रभावी अभिनय

Gramin Varta
Last updated: October 3, 2026 8:08 am
Gramin Varta
386 Views
Share

शालेय स्नेहसंमेलनापासून सुरू झालेला प्रवास पोहोचला मल्टिप्लेक्सपर्यंत; कोकणातील ग्रामीण कलाकाराची चित्रपटसृष्टीत दमदार झेप

लांजा/अरबाज नेवरेकर: महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून तुफान गर्दी खेचणाऱ्या आणि प्रेक्षकांची दाद मिळवणाऱ्या ‘जयंती २’ या मराठी चित्रपटात लांजा तालुक्यातील कुर्णे गावचा तरुण अभिनेता आर्यन अनिल कासारे याने साकारलेली भूमिका सध्या विशेष कौतुकाचा विषय ठरत आहे. ग्रामीण भागातील मातीशी नाळ जोडून अभिनयाचे बाळकडू घेतलेल्या आर्यनने या चित्रपटात अत्यंत लक्षवेधी काम करून रूपेरी पडद्यावर स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आहे.

अभिनेता बनण्याची जिद्द बालपणापासूनच उराशी बाळगणाऱ्या आर्यनच्या अभिनय प्रवासाची सुरुवात वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी शालेय स्नेहसंमेलनाच्या मंचावरून झाली. शिक्षक राजेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर त्याने संस्कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून बालकलाकार म्हणून रंगभूमी गाजवली. संस्कृती फाऊंडेशनच्या ‘बनी तो बनी’ या बहुचर्चित एकांकिकेने राज्यस्तरीय स्पर्धा गाजवत अनेक पारितोषिके पटकावली, ज्यात आर्यनच्या सहज आणि प्रगल्भ अभिनयाची राज्यभरात वाहवा झाली.

रंगभूमीवरील अनुभवाच्या बळावर आर्यनने ‘माझा एल्गार’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘सिनेमास्कोप’ या चित्रपटात संजय कापरे, विना जामकर आणि मिलिंद पटवर्धन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची मोठी संधी त्याला मिळाली. आधीच्या चित्रपटांमध्ये केलेल्या दर्जेदार कामामुळे आर्यनचा अभिनय अधिक धारदार होत गेला. अभिनयाची आवड जोपासताना त्याने शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. कुर्णे येथील प्राथमिक शाळा आणि लांजाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने गोवा येथील नामांकित कला अकादमीतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या काळात व्यावसायिक व स्पर्धात्मक नाटकांतून त्याचा वावर कायम राहिला.

नाट्य क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. याच दरम्यान त्याने ‘जयंती २’ चित्रपटासाठी ऑडिशन दिली आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर या बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळवली. सध्या महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्समध्ये ‘जयंती २’ चित्रपटाला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादात आर्यनच्या कामाची समीक्षक आणि प्रेक्षकांकडून मुक्तकंठाने प्रशंसा केली जात आहे. कोकणातील ग्रामीण भागातून सुरू झालेला हा अभिनय प्रवास आज यशाच्या शिखरावर पोहोचल्याने संपूर्ण लांजा तालुक्यातून आर्यन कासारेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5435569
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

खेड : नदीकाठी फेरफटका मारताना मधमाशांच्या हल्ल्यात की वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर : देवळे येथे गणेशोत्सवासाठी  गावी आलेल्या चाकरमान्यांची पाण्यासाठी वणवण

Gramin Varta
2 Min Read

पाली येथे भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

एस.टी.च्या नव्या मोठ्या गाड्यांमुळे सैतवडेवासीय वेठीस; ग्रामीण मार्गांवर लहान गाड्या सुरू करण्याची अब्दुल गणी खतीब यांची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

लांजा

लांजा: उड्डाणपुलावर भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू; चालक घटनास्थळावरून पसार

2 Min Read
लांजा

रिंगणे येथे घरफोडी करून पळणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांना ग्रामस्थांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले

3 Min Read
लांजा

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

2 Min Read
लांजा

मजुराला धडक देऊन पसार झालेला चालक पाचलमधून जेरबंद; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लांजा पोलीस पथकाचा सन्मान

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?